पक्षी घागरांनी भागविली जात आहे पक्ष्यांची तहान

By Admin | Updated: April 17, 2016 00:44 IST2016-04-17T00:44:25+5:302016-04-17T00:44:25+5:30

दिवसेंदिवस पाण्याचा दुष्काळ पडत आहे. त्यामुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. पाण्याअभावी पशूपक्षी मृत्युमुखी पडत आहे.

Birds are being fed by swamps, thirsty birds | पक्षी घागरांनी भागविली जात आहे पक्ष्यांची तहान

पक्षी घागरांनी भागविली जात आहे पक्ष्यांची तहान

नागरिकांना पक्षी घागर वितरित : तरुण पर्यावरणवादी मंडळ व वनविभागाचा उपक्रम
शंकरपूर : दिवसेंदिवस पाण्याचा दुष्काळ पडत आहे. त्यामुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. पाण्याअभावी पशूपक्षी मृत्युमुखी पडत आहे. पाण्याअभावी पक्षी मृत्युमुखी पडू नये म्हणून पर्यावरण क्षेत्रात काम करणारी तरुण पर्यावरणवादी मंडळाने पुढाकार घेतला आहे. पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पक्षी घागर उपक्रम मागील १३ वर्षापासून हाती घेतला आहे. यावर्षीही पक्ष्यांसाठी पक्षी घागर तयार करण्यात आल्या आहेत.
तिव्र उन्हामुळे शेतशिवारातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कोरडे झाले आहेत. त्यामुळे पशुपक्ष्यांना जीवनदान देण्यासाठी तरुण पर्यावरणवादी मंडळाचे सदस्य सरसावले आहेत. गाव शिवारात घर तिथे पक्षीघागर ही मोहीम या मंडळाने कार्यान्वीत केली आहे. गावातील ज्या नागरिकांच्या अंगणात झाडे आहेत, त्या घरी मोफत पक्षी घागर देण्यात येत आहे. यासोबतच जनजागृती म्हणून फेसबूक व्हॉटसअ‍ॅप संदेश तयार केला असून गावात ‘चला पक्ष्यांना पाणी पाजू या’ या आशयाचे फलक लावण्यात आले आहे.
यावर्षी मंडळाने ५०० पक्षी घागर तयार केले असून गावातील व परिसरातील खेडयात त्याचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमाला लागणारा निधी तरुण पर्यावरणवादी मंडळ व वनविभाग कार्यालय चिमूर यांच्या संयुक्त विद्यमानाने उभा केला आहे. यावर्षी पक्षी घागर वाटप पर्यावरणक्षेत्रात काम करणारे जेष्ठ कार्यकर्ते सुर्यभान खोब्रागडे, वनपरिक्षेत्र अधिकारी आक्केवार, वनपाल खोब्रागडे, धुर्वे, पडवे, मंडळाचे अध्यक्ष विरेंद्र हिंगे यांच्या उपस्थिती करण्यात आले. या उपक्रमात मंडळाचे अमोद गौरकर, मोरेश्वर पांगुळ, संतोष कोरडे, पवन राहून, विजय गजभे, योगेश पचारे, रोशन ढोक, आशु हजारे, अमित शिवरकर, जगदिश पेंदाम, सतिश भजभूजे, सोनू बावणकर, अमर दडवे, शुभम शिवरकर, महेश शिवरकर, निरंजन शिवरकर आदी सदस्य परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Birds are being fed by swamps, thirsty birds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.