संजीवन पर्यावरण संस्थेतर्फे पक्षी घागर उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:24+5:302021-04-02T04:29:24+5:30

उन्हाळ्यातही कायम राहणार पक्ष्यांचा किलबिलाट मूल : उन्हाळ्याचे दिवस असल्याने पक्ष्यांना पाण्याची नितांत गरज भासणार आहे. हे हेरून येथील ...

Bird Ghagar initiative by Sanjeevan Paryavaran Sanstha | संजीवन पर्यावरण संस्थेतर्फे पक्षी घागर उपक्रम

संजीवन पर्यावरण संस्थेतर्फे पक्षी घागर उपक्रम

उन्हाळ्यातही कायम राहणार पक्ष्यांचा किलबिलाट

मूल : उन्हाळ्याचे दिवस असल्याने पक्ष्यांना पाण्याची नितांत गरज भासणार आहे. हे हेरून येथील संजीवन पर्यावरण संस्थेने पक्षी घागर उपक्रम राबविण्याचा संकल्प केला. यासाठी पक्ष्यांसाठी शहरातील विविध ठिकाणी घागरी बांधण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

मूल येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील झाडांवर पक्षी घागर बांधून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर मूल रेल्वे स्टेशन, कर्मवीर महाविद्यालय व महावितरण कार्यालयातील झाडांवर पक्षी घागर बांधण्यात आल्या. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उज्ज्वल इंदूरकर, रेल्वे स्टेशनचे अधीक्षक अभिषेक कुमार, कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य केवल कराडे, महावितरण कार्यालयाचे उपकार्यकारी अभियंता चंदनसिंह चौरसिया, सहायक अभियंता पंकज उजवने, सहाणक अभियंता मनोज रणदिवे व वन्यजीव अभ्यासक आणि संजीवन पर्यावरण संस्थेचे उमेशसिंह झिरे, वनरक्षक सुभाष मरस्कोले, प्रशांत केदार, प्रशांत मुत्यारपवार, राहुल जिरकुंटवार, स्वप्नील आक्केवार, दिनेश खेवले आदी उपस्थित होते.

Web Title: Bird Ghagar initiative by Sanjeevan Paryavaran Sanstha