ब्रह्मपुरीत होणार जैवविविधता पार्क

By Admin | Updated: April 9, 2016 01:36 IST2016-04-09T01:36:20+5:302016-04-09T01:36:20+5:30

शहराच्या व तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा जैवविविधता पार्क लवकरच ब्रह्मपुरीतील देलनवाडी ...

Biodiversity Park to be held in Brahmaputra | ब्रह्मपुरीत होणार जैवविविधता पार्क

ब्रह्मपुरीत होणार जैवविविधता पार्क

पर्यटन स्थळ विकास योजना : १० हेक्टर जमिनीचा होणार वापर
ब्रह्मपुरी : शहराच्या व तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा जैवविविधता पार्क लवकरच ब्रह्मपुरीतील देलनवाडी मार्गावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाजवळ साकारण्यात येणार आहे. त्यामुळे अभ्यासकांना, पर्यटकांना, लहान मुलांना, वयोवृद्ध नागरिकांना ही पर्वणी ठरणार आहे.
ब्रह्मपुरी उपवनविभाग चंद्रपूर जिल्ह्याचा पश्चिम विभाग असून १९९३ साली स्थापना करण्यात आली. हा उपवनविभाग शेकडो हेक्टरवर विस्तारलेला आहे. ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, वरोरा आदी तहसिलींचा यात समावेश आहे. त्यापैकी उत्तर परिक्षेत्रात ब्रह्मपुरीला गट क्र. २४२, २४३ व २५४ मध्ये शासकीय तंत्रनिकेतनजवळ गोसीखुर्द धरणाला लागून २ कोटी ५६ लाख रुपयांचा जैवविविधता पार्क येत्या काही दिवसात साकारणार आहे. या पार्कमध्ये विविध प्रकारचे बांबू, खूप कमी पाण्यात जगणाऱ्या झाडांचे प्रकार, १३० जातीचे विविध झाडे, रेन वॉटर हॉर्वेस्टींग प्रकल्प, संगीतमय कारंजे, कारंजांचे विविध प्रकार, सार्वजनिक शौचालये, पूल, चारही बाजुने पक्की संरक्षण भिंत, विद्युत रोषणाई, ई. प्रकारांनी सजणार असल्याने या परिसरात मनमोहक अशा प्रकारची अभ्यासपूर्ण पार्क साकारणाच्या प्रक्रियेला लवकरच सुरवात होणार आहे. या कामाच्या जागेची पाहणी खासदार अशोक नेते माजी आमदार प्रा.अतुल देशकर, उपवनसंरक्षक आशिष ठाकरे, सूर्यभान खोब्रागडे, डॉ. मोहन वाडेकर या समितीने नुकतीच केली आहे. या दरम्यान नगराध्यक्ष रीता उराडे, परेश शहादाणी, दीपक उराडे, क्रिष्णा सहारेल नानाजी तुपट, जगदीश तलमले व वनविभागाचे आशीर्वाद मेश्राम, पंधरे, आशा चव्हाण, गीता नन्नावरे, व संपूर्ण अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Biodiversity Park to be held in Brahmaputra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.