लक्झरीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By Admin | Updated: December 16, 2015 01:28 IST2015-12-16T01:28:21+5:302015-12-16T01:28:21+5:30
ब्रह्मपुरीहून भरधाव वेगाने वडसाकडे जाणाऱ्या लक्झरी बसने धडक दिल्याने दुचाकी चालकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.

लक्झरीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरीहून भरधाव वेगाने वडसाकडे जाणाऱ्या लक्झरी बसने धडक दिल्याने दुचाकी चालकाचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.
नागपूर-वडसा या मार्गावर अवैध चालणारी गायत्री नामक लक्झरी बस (एम.एच.४०, एम.१०१४) भरधाव वेगाने ब्रह्मपुरीहून वडसाकडे जात असताना पेपरमिल-चिलगाव फाट्याजवळ एका दुचाकी (एमएच ३३ बी ६८१०) ला या बसने जबर धडक दिली. त्यात दुचाकी चालक मच्छिंद्र श्रावण मेश्राम (२८) याचा जागीच मृत्यू झाला.
दोन महिन्यांपासून मच्छिंद्र चंद्रपूर येथे कामाकरिता गेला होता. नुकताच तो स्वगावी चिखलगाव येथे आला होता. आज सायंकाळी घरची दुचाकी घेऊन तो निघाला असता ही दुर्घटना घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेवून लक्झरी चालकास ताब्यात घेतले व मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालयात रवाना केला. (तालुका प्रतिनिधी)