राजुरा येथे विकासकामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:15 IST2020-12-28T04:15:01+5:302020-12-28T04:15:01+5:30
राजुरा : राजुरा शहराच्या विकासकामांना गती देण्याच्या अनुषंगाने येथे दोन कोटी सहा लाख रुपयांच्या विकासांचे भूमीपूजन आमदार सुभाष धोटे ...

राजुरा येथे विकासकामाचे भूमिपूजन
राजुरा : राजुरा शहराच्या विकासकामांना गती देण्याच्या अनुषंगाने येथे दोन कोटी सहा लाख रुपयांच्या विकासांचे भूमीपूजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. भारत चौक वार्ड येथे बगीचा सौंदर्यीकरण, पेठ वार्ड आणि जवाहर नगर येथे रस्ता कामांचे भूमिपूजन याप्रसंगी करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष सुनील देशपांडे, नगरसेवक हरजितसिंग संधू, आनंद दासरी, गजानन भटारकर, राधेश्याम अडानिया, मधुकर चिंचोलकर, दिलीप देरकर, नगरसेविका सौ. वज्रमाला बतकमवार, शारदा टिपले, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, अभिजीत धोटे, विजय जांभुळकर, रवी जामुनकर यासह भारत चौक, पेठ वार्ड आणि जवाहर नगर वार्ड येथील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.