सावली येथे दोन कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन
By Admin | Updated: October 3, 2016 00:49 IST2016-10-03T00:49:29+5:302016-10-03T00:49:29+5:30
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सावली नगरपंचायत क्षेत्रातील दोन कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शनिवारी पार पडले.

सावली येथे दोन कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन
पालकमंत्र्यांची उपस्थिती : विकास कामांना येणार गती
चंद्रपूर : राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सावली नगरपंचायत क्षेत्रातील दोन कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शनिवारी पार पडले.
यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, जिल्हा परिषद सदस्या कुकडे, नगरसेवक चंद्रकांत संतोषवार आदी उपस्थित होते. गेल्या वर्षी सावली शहरात दोन कोटींची विकासकामे करण्याचे आश्वासन पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यामुळे मंजूर निधीतून होणाऱ्या विविध कामांचा शुभारंभ त्यांनी केला.
सावली शहरात दोन कोटी रुपये खर्च करून विकासकामे करण्याचा शब्द आपण दिला होता. दिलेले आश्वासन आपण पूर्ण करीत असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सावली येथे होणाऱ्या विविध कामांमध्ये सिमेंट क्रॉक्रीट रस्ता बांधकाम, सिमेंट क्रॉक्रीट नाली बांधकामाचा समावेश आहे. शहरात ठिकठिकाणी नाली व रस्त्यांचे बांधकाम होणार आहे.सामान्य रूग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात येत असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. (तालुका प्रतिनिधी)