भिसीत नगरपंचायत होणारच - बंटी भांगडिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:18 IST2021-07-22T04:18:14+5:302021-07-22T04:18:14+5:30
भिसी : भिसी हे चिमूर विधानसभा क्षेत्रातील आवडीचे शहर आहे. येथील जनतेचे प्रेम विसरु शकत नाही. भिसीच्या जनतेला दिलेले ...

भिसीत नगरपंचायत होणारच - बंटी भांगडिया
भिसी : भिसी हे चिमूर विधानसभा क्षेत्रातील आवडीचे शहर आहे. येथील जनतेचे प्रेम विसरु शकत नाही. भिसीच्या जनतेला दिलेले नगर पंचायतचे आश्वासन नक्कीच पूर्ण होईल, असा पुनरुच्चार आमदार बंटी भांगडिया यांनी केला. भिसी येथील विठ्ठल रुखमाई सभागृहामध्ये सत्काराप्रसंगी ते बोलत होते. हा सत्कार समारंभ श्री छत्रपती शाहू महाराज बहूद्देशीय मंडळाने आयोजित केला होता. यावेळी मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार भांगडिया यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर बाबूराव बोमेवार, विठ्ठल रुखमाई देवस्थानचे अध्यक्ष गरीबा निमजे, वसंतराव वारजूकर, राजू देवतळे, बंडू जावळेकर, गोपाल बलदुवा, प्रदीप कामडी उपस्थित होते. संचालन करून आभार किशोर आष्टनकर यांनी मानले.
कार्यक्रमासाठी पंकज गाडीवार, सारंग देशपांडे, यशवंत भुजाडे, निखिल काळे, सुनील मेश्राम,बंटी सहारे, नीलेश गभणे, प्रशांत गभणे, गणेश भुरके, प्रशांत जुमडे, देवा मुंगले, आकाश ढबाले व इतर कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.