शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

भीमा कोरेगाव दगडफेकीचे जिल्ह्यात पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:48 IST

भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या कार्यक्र्रमासाठी एकत्र जमलेल्या भिमसैनिकावर भ्याड हल्ला करण्यात आला.

ठळक मुद्देगावागावांतून निषेध : मूल, सावलीत कडकडीत बंद

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : भीमा कोरेगाव येथे शौर्य दिनाच्या कार्यक्र्रमासाठी एकत्र जमलेल्या भिमसैनिकावर भ्याड हल्ला करण्यात आला. याचे पडसाद मंगळवारी चंद्रपूर जिल्ह्यात उमटले. मूल, सावली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. चंद्रपूर, भद्रावती येथे रॅली काढून घटनेचा निषेध करण्यात आला. यासोबतच जिल्ह्यातील विविध गावात बौध्द अनुयायांनी निषेध नोंदवित प्रशासनाला निवेदन सादर केले.मूल येथील बौद्ध संघटनांनी निषेध नोंदवत कडकडीत बंद पाडण्याचे आवाहन केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत मूल शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवली. भिमा कोरेगाव येथे काही समाजकंटकांनी दगडफेक व जाळपोळ करून चांगल्या कार्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. याचा निषेध नोंदवित मूल येथील बौद्ध बांधवांनी बाजारपेठ, शाळा, महाविद्यालय बंद करण्याचे आवाहन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी पोलीस प्रशासनाकडून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.मूलसोबतच सावली शहरातही कडकडीत बंद पाळण्यात आला. हल्ला करणाºया आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. येत्या पाच दिवसात हल्लेखोर समाजकंटकांना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून सर्व आंबेडकरी अनुयायांतर्फे देण्यात आला. बंदच्या आवाहनाला सावलीतही शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शाळा, महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात हिरालाल दुधे, यशवंत डोहणे, जे.जे. नगारे, प्रमोद गेडाम, उत्तम गेडाम, उदय गडकरी यांचा प्रामुख्याने समावेश होता. सदर बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. शांततेत बंद पाळण्यात आला. परिस्थितीवर ठाणेदार स्वप्नील धुळे व सहकारी लक्ष ठेवून होते.भद्रावतीत आज बंददरम्यान, भीमा कोरेगाव घटनेचा निषेध करण्यासाठी ३ जानेवारीला भद्रावती बंदचे आवाहन करण्यात आले आहे.बल्लारपुरात पोलिसांची शांतता सभाभिमा कोरेगावच्या घटनेचे चंद्रपूर जिल्ह्यातही तीव्र पडसाद उमटू लागल्याने बल्लारपूर पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी शांतता सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व जनतेला शांतता व संयम पाळण्याचे आवाहन करण्यात आले. सभेला उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कर, तहसीलदार विकास अहीर, सहायक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, आंबेडकरी अनुयायी, व्यापारी, विविध संस्था व सामाजिक, धार्मिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.चंद्रपुरात निषेधभीमा कोरेगाव येथील घटनेचा काँग्रेस कमिटीनेही निषेध केला आहे. चंद्रपूर जिल्हा अनुसूचित जाती विभागाच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी अनुसूचित जाती विभाग प्रदेश उपाध्यक्ष संजय रत्नपारखी, शालिनी भगत, कुणाल रामटेके, मितीन भागवत, कल्याण सौदारी, सुरज गावंडे आदी उपस्थित होते. त्यानंतर भारिप बहुजन महासंघाच्या वतीनेही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, सचिव धीरज बांबोळे, राजू किर्तक, धीरज तेलंग, रामजी जुनघरे आदी उपस्थित होते.भद्रावती येथे निदर्शनेभद्रावती येथील भारिप बहुजन महासंघाच्या वतीने भिमा कोरेगाव घटनेचा तीव्र निषेध केला. यावेळी निदर्शनेही देण्यात आली. त्यानंतर तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री, राज्यपाल यांना निवेदन पाठविण्यात आले. गृहमंत्रालय मुख्यमंत्री सांभाळत असल्याने त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई न झाल्यास भारिप बहुजन महासंघातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा संघटक कपूर दुपारे, तालुका उपाध्यक्ष विशाल कांबळे, विठ्ठल पुनवटकर, असित सुर्यवंशी, संदीप चटपकर, संदीप जुमडे, राहुल साखरे, अमर कांबळे, प्रितम मेश्राम, संदीप इंगोले, विक्की खडसे, प्रतिक दारवेकर, आनंद मेश्राम, राहुल खडसे, आनंद इंगळे, शेरू साव, सुरज शेंडे, विजय पाटील आदी उपस्थित होते.बुधवारी चंद्रपूर बंदचे आवाहनभिमा कोरेगाव हल्ल्यातील सर्व आरोपींना तत्काळ पकडण्यात यावे, या कटामागील सूत्रधार कोण, हे शोधून त्यालाही अटक करण्यात यावी, या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ३ जानेवारी रोजी अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या अनुषंगाने चंद्रपुरात मंगळवारी बॅ. राजाभाऊ खोब्रागडे भवनात तातडीची बैठक घेण्यात आली. यात ३ जानेवारीला चंद्रपूर बंदचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत व्ही.डी. मेश्राम, खुशाल तेलंग, बाळू खोब्रागडे, देशक खोब्रागडे, बंडू नगराळे, स्नेहल रामटेके, अ‍ॅड. सत्यविजय उराडे, अंकूश वाघमारे व आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते.