मारहाणप्रकरणी राजुरा येथे भिक्खू संघाचा मोर्चा
By Admin | Updated: September 17, 2015 00:54 IST2015-09-17T00:54:16+5:302015-09-17T00:54:16+5:30
चंद्रपूर येथील विहारात घुसून भिक्खू आर्यसुत्त यांच्यावर काही समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेर्धात ...

मारहाणप्रकरणी राजुरा येथे भिक्खू संघाचा मोर्चा
कारवाईची मागणी : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
राजुरा : चंद्रपूर येथील विहारात घुसून भिक्खू आर्यसुत्त यांच्यावर काही समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेर्धात मंगळवारी राजुरा येथील उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय भिक्खु संघाद्वारे करण्यात आली.
मंगळवारी पंचायत समिती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. मोर्चा उईके चौक, नेहरू चौक, आंबेडकर चौक, जुना बस स्थानक मार्गे उपविभागीय कार्यालयावर पोहोचला. यजावेळी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी भिक्षु शांतरक्षित महाथेरो, कृपाशरण महाथेरो, सुमन वण्णो महाथेरो, बुद्धशरण थेरो, सच्चक थेरो, अमिरूद्ध, श्रद्धानंद, चेनीय बोधी, भिक्खुनी चेतिय बोधी, मनेर खेमा आदींनी मार्गदर्शन केले. निवेदन देताना शिष्टमंडळात चरणदास नगराळे, सिद्धार्थ पथाडे, दयाराम मून, चंद्रकांत ब्राह्मणे, राजू झोडे बल्लारपूर, डॉ. उमाकांत धोटे, ऋषी वाघमारे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)