भावसार सद्भाव संपर्क अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:33 IST2021-09-08T04:33:45+5:302021-09-08T04:33:45+5:30

चंद्रपूर : भावसार विकास बहूद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील भावसार यांच्या उपस्थितीत सद्भाव संपर्क भावसार समाजाची दिशा व ...

Bhavsar Sadbhav Sampark Abhiyan | भावसार सद्भाव संपर्क अभियान

भावसार सद्भाव संपर्क अभियान

चंद्रपूर : भावसार विकास बहूद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील भावसार यांच्या उपस्थितीत सद्भाव संपर्क भावसार समाजाची दिशा व दशा अभियान पार पडले. अध्यक्षस्थानी डॉ. नंदकिशोर मैंदळकर तर प्रमुख पाहुणे भास्कर मुधोळकर, जिल्हाध्यक्ष योगिता धनेवार, अभिलाशा मैंदळकर, कमल अलोने, छाया बर्डे, वैशाली जोगी, प्रीती लगदिवे, कांता दखणे, पायल बर्डे, बबन धनेवार, अनिल लाखदिवे, किरण बर्डे, मीनाक्षी अलोने आदी उपस्थित होते. डॉ. भावसार म्हणाले की, जिल्ह्यात असंख्य भावसार समाज आहे. त्यांची दिशा व दशा काय आहे, हे माहीत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना संघटित करून जिल्ह्यात राजकारणात समाजकारणात आपले स्थान व अस्तित्व काय आहे, हे दाखविता आले पाहिजे. भावसार सद्भाव संपर्क अभियानाची सुरुवात नाशिक येथून झाली. भावसार समाजातील बंधू-भगिनींनी एकसंघ होऊन कार्याची व्याप्ती वाढवावी. समाजोपयोगी उपक्रमावर भर देऊन समाज बांधव संघटित करावे, असे आवाहन मैंदळकर यांनी केले. संचालन, छाया बर्डे यांनी केले. प्रास्ताविक योगिता धनेवार यांनी केले.

Web Title: Bhavsar Sadbhav Sampark Abhiyan