भद्रावतीत पार पडली भावगीत स्पर्धा
By Admin | Updated: October 13, 2014 23:33 IST2014-10-13T23:33:09+5:302014-10-13T23:33:09+5:30
यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे मंगळवारी ‘भावसौरभ’ हा मराठी भावगीत स्पर्धेचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य समितीद्वारा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य जयंत वानखेड

भद्रावतीत पार पडली भावगीत स्पर्धा
भद्रावती : यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे मंगळवारी ‘भावसौरभ’ हा मराठी भावगीत स्पर्धेचा कार्यक्रम सांस्कृतिक कार्य समितीद्वारा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य जयंत वानखेड, उपप्राचार्य सुधीर मोते यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेत २५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
रंग बावऱ्या स्वप्नांना, हंबरून वासराले, टिकटिक वाजती, फुलले रे क्षण माझे, नारी जन्माची पुण्याई, रडते निळा आखराची माया, मोरया-मोरय्या, आनंद या जीवनाचा अशी एकापेक्षा एक बहारदार भावगीते विद्यार्थ्यांनी सादर केली.
स्पर्धेते प्रथम पारितोषिक अंशुमा कोंडेकर, द्वितीय पारितोषिक कुणाल चिमुरकर, तृतीय पारितोषिक प्रणाली नरड यांनी तर वैष्णवी सोनटक्के, हर्षल पारशिव, रजनी गडलिंग, सरिता देऊरकर, शितल पिंपळशेंडे हे प्रोत्साहनपर पारितोषिकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी नवनवीन गीत सादर केले.
परिक्षक म्हणून संगीत विशारद स्नेहल ठोंबरे हिने जबाबदारी सांभाळली. संचालन कैकर्यंमवार व प्रा. विजय गायकवाड यांनी केले. तर प्रा. प्रेमा पोटदुखे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)