भारिप-बहुजन महासंघाची बल्लारपुरात बैठक

By Admin | Updated: July 18, 2014 00:00 IST2014-07-18T00:00:04+5:302014-07-18T00:00:04+5:30

भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी मानद सचिव जी.के. उपरे यांच्या अध्यक्षतेखाली व भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा संघटक भारत थुलकर,

Bharamp-Bahujan Mahasangh's Ballarpur meeting | भारिप-बहुजन महासंघाची बल्लारपुरात बैठक

भारिप-बहुजन महासंघाची बल्लारपुरात बैठक

चंद्रपूर : भारिप बहुजन महासंघाचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व माजी मानद सचिव जी.के. उपरे यांच्या अध्यक्षतेखाली व भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा संघटक भारत थुलकर, जिल्हा उपाध्यक्ष उमेश कडू, जिल्हा सचिव सिद्धार्थ शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बल्लारपूर येथील शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांची सभा पार पडली.
सभेत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा ७ आॅगस्टला बल्लारपूरला घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल, पोंभुर्णा व बल्लारपूर तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करुन हा मेळावा यशस्वी करण्याचे आवाहन शहर अध्यक्ष दिनेश दुपारे यांनी केले.
सभेला मूल तालुकाध्यक्ष दिलीप वाळके, पोंभुर्णा, तालुकाध्यक्ष एन.डी. थेरकर, माजी तालुकाध्यक्ष श्याम गेडाम, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव सत्यभामा भाले, बल्लारपूर महिला आघाडीच्या ताई फुलझेले, माया गणवीर, वत्सला तेलंग, मनोहर मानकर, आनंद साठे, कोठारीचे उपसरपंच अमोल कातकर, धिरज बोबोळे, दिवाकर जावळीकर, मुदन बुरचुंडे, गणेश गोंडाणे, रामदास आटे, संदीप लोढे, विजय निरंजने आदि कार्यकर्त्याची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन अरुण लोखंडे यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Bharamp-Bahujan Mahasangh's Ballarpur meeting