भानामती, जादूटोण्यावरून अमानुष घटना रोखण्यासाठी कृती आराखडा तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:33 IST2021-09-24T04:33:36+5:302021-09-24T04:33:36+5:30

असा आहे कृती आराखडा १. जादूटोणा व भानामतीमुळे ग्रस्त गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जादूटोणाविरोधी कृती दल तयार करणे. यामध्ये सरपंच, ...

Bhanamati, prepared an action plan to prevent inhuman incidents from witchcraft | भानामती, जादूटोण्यावरून अमानुष घटना रोखण्यासाठी कृती आराखडा तयार

भानामती, जादूटोण्यावरून अमानुष घटना रोखण्यासाठी कृती आराखडा तयार

असा आहे कृती आराखडा

१. जादूटोणा व भानामतीमुळे ग्रस्त गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जादूटोणाविरोधी कृती दल तयार करणे. यामध्ये सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, दलित प्रतिनिधी, मागासवर्गीयांचा प्रतिनिधी, महिला मंडळ प्रतिनिधी असा सात ते आठ जणांचा समावेश असेल. या कृती दलाला एक दिवसाचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाची रूपरेषाही सादर केली आहे. ३० ते ३५ वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणारी मंडळी हे प्रशिक्षण देतील. नंतर हे कृती दल जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये तयार केले जाईल.

२. गावागावांत सामूहिक प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.

गावागावांत जादूटोणाविरोधी कृती दल तयार झाले तर या माध्यमातून जादूटोणाविरोधी विधेयक २०१३ हेसुद्धा जनतेला माहिती होईल. ज्या काही अंधश्रद्धा आहेत त्यावर प्रबोधन होईल, या अनुषंगाने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सूचनेवरून कृती आराखडा तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे.

- हरीभाऊ पाथोडे, राज्य संघटक, अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, चंद्रपूर.

Web Title: Bhanamati, prepared an action plan to prevent inhuman incidents from witchcraft