भद्रावतीकरांनी केला स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प

By Admin | Updated: November 5, 2015 01:26 IST2015-11-05T01:26:07+5:302015-11-05T01:26:07+5:30

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत आपण स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प करतो, असे म्हणत नगरपालिका सभागृहात

Bhadrawatikar made the resolution of the sampatta of cleanliness | भद्रावतीकरांनी केला स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प

भद्रावतीकरांनी केला स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प

भद्रावती : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत आपण स्वच्छतेच्या सप्तपदीचा संकल्प करतो, असे म्हणत नगरपालिका सभागृहात उपस्थित शेकडो भद्रावतीकरांनी शपथ घेतली. माझे पहिले पाऊल स्वच्छतेच्या सहभागाच्या ठाम निर्धाराने येथून तर सातवे पाऊल हरित स्वच्छ महाराष्ट्र साकारण्याचे असेल, असा याप्रसंगी संकल्प करण्यात आला.
केंद्र शासनाच्या निर्देशानुसार स्वच्छ भारत अभियानाची परिणामकारण अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने सोमवारी न.प. सभागृह भद्रावती येथे ‘स्वच्छ भद्रावती, हरित भद्रावती’ संकल्पना राबविणे याबाबत न.प.तर्फे एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे भद्रावती येथील शाळेपासून विविध कार्यालय, तसे विविध संघटनांपासून डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक व शहरातील प्रतिष्ठित नागरिक या सभेला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार बाळू धानोरकर होते. नगराध्यक्ष अनिल धानोरकर, चंद्रपूर मनपा उपायुक्त डॉ.विजय इंगोले, न.प. उपाध्यक्ष प्रफुल चटकी, पोलीस उपनिरीक्ष हेमने, मुख्याधिकारी विनोद जाधव आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
भद्रावतीचे नागरिक सुजाण व जागृत आहेत. भद्रावतीच्या विकासात सर्वांचे योगदान आहे. सर्वांनी निर्धार केल्यास शहरात स्वच्छता नक्कीच नांदेल असे उद्गार याप्रसंगी आमदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. भद्रावती शहराला सुंदर, स्वच्छ, हिरवे व निरोगी बनविण्यासाठी ‘स्वच्छ भद्रावती, हरित भद्रावती’ हे अभियान राबविण्यात येत असून अभियान यशस्वी करण्यासाठी शहरातील नागरिकांनी अगदी मनापासून सहकार्य करावे व स्वच्छतेच्या बाबतीत भद्रावतीला शिखरावर पोहचवावे, असे आवाहन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी याप्रसंगी केले.
याप्रसंगी स्वच्छतेबाबतची फिल्म दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सचिन सरपटवार तर प्रास्ताविक तथा फिल्मचे सादरीकरण मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी केले. कार्यक्रमाला विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bhadrawatikar made the resolution of the sampatta of cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.