भद्रावतीत रास्तारोको आंदोलन

By Admin | Updated: November 1, 2016 00:54 IST2016-11-01T00:54:32+5:302016-11-01T00:54:32+5:30

मोबाईलवरील व्हाट्स अ‍ॅप ग्रुपवर काही समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट टाकण्यात आली.

Bhadravati Rastaroko Movement | भद्रावतीत रास्तारोको आंदोलन

भद्रावतीत रास्तारोको आंदोलन

आरोपीला अटक करा : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर
भद्रावती : मोबाईलवरील व्हाट्स अ‍ॅप ग्रुपवर काही समाजकंटकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट टाकण्यात आली. ही पोस्ट येथील राजू दारुंडे यांच्या मोबाईलवर येताच त्यांनी याबाबत समाजबांधवांना कळविले. ही पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घ्यावे, या मागणीसाठी भद्रावती येथील पेट्रोल पंप चौकात नागपूर- चंद्रपूर महामार्गावर तब्बल अर्धा तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
व्हॉट्स ग्रुपवरील या पोस्टची पसरताच येथील समाज कार्यकर्ते विशाल बोरकर यांनी बोद्ध समाजबांधवांची बैठक बोलावून पोलीस स्टेशन भद्रावती येथे हरहर महादेव या ग्रुपचे अ‍ॅडमीन व ज्यांनी ही पोस्ट टाकली, त्या व्यक्तीला त्वरीत अटक करण्याची मागणी केली. या घटनेचा निषेध म्हणून मुख्य महामार्गावर तब्बल अर्धा तास रास्ता रोको करुन नारेबाजी करण्यात आली. चंद्रपूर-नागपूर या मार्गावर २४ तास वाहतूक सुरू राहते. या आंदोलनामुळे या मार्गावर वाहनांची रांग लागली होती.
या आंदोलनात विशाल बोरकर, विजय मेश्राम, प्रज्वल पेटकर, राजेश नागदेवते, डी. एस. रामटेके, सतिश मस्के, अजय देवगळे, संजय देवगळे, संदीप जिवने यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. ठाणेदार आशिष गजभीये यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक किशोर मित्तलवार यांच्या पथकाला अमरावती येथे रवाना केले व अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. (शहर प्रतिनिधी)

मुख्य आरोपीला अटक करा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत मोबाईल व्हाट्स अ‍ॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने आमच्या बोद्ध बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घ्यावे, या मागणीकरिता आम्ही रास्ता रोको करुन पोलिसांचे लक्ष वेधले आहे. आरोपीला अटक झाली नाही तर तिव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समाज कार्यकर्ते विशाल बोरकर यांनी सोमवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

बोद्ध बांधवांनी घटनेचा निषेध नोंदवून आरोपीला अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर रास्तारोको करुन पोलिसांची कोणतीही चूक नसताना त्यांनी पोलिसांच्या विरोधात नारेबाजी केली. या प्रकरणी यातील १० ते १२ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
-आशिष गजभिये, ठाणेदार, भद्रावती

Web Title: Bhadravati Rastaroko Movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.