भद्रावती पंचायत समिती वाऱ्यावर

By Admin | Updated: April 19, 2015 01:04 IST2015-04-19T01:04:59+5:302015-04-19T01:04:59+5:30

एखादा शसकीय कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी कामानिमित्त बाहेर गेल्यास तेथील बहुतके कर्मचारी आपल्या खुर्चीवर आढळत नाही, ...

Bhadravati Panchayat Committee on the wind | भद्रावती पंचायत समिती वाऱ्यावर

भद्रावती पंचायत समिती वाऱ्यावर

विनायक येसेकर भद्रावती
एखादा शसकीय कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी कामानिमित्त बाहेर गेल्यास तेथील बहुतके कर्मचारी आपल्या खुर्चीवर आढळत नाही, त्यामुळे शासकीय कामाचा खोळंबा होतो, ही बाब ‘लोकमत’ने केलेल्या स्टींग आॅपरेशनने उघड झाली.
या पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी प्रकाश मानकर हे गुजरातमधील गांधीनगर येथे प्रशिक्षणाकरिता गेले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत या कार्यालयाचा कारभार कसा चालतो, याची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने १६ एप्रिलला दुपारी ३.३० वाजता पंचायत समिती कार्यालयाचा फेरफटका मारला. त्यावेळी बहुतके कर्मचारी आपल्या टेबलवरुन बेपत्ता असल्याचे दिसून आले. या पंचायत समितीअंतर्गत एकूण ७० ग्रामपंचायती आहेत. संबंधित गावातील नागरिक आपली कामे घेवून येथे येतात. परंतु कर्मचारी कामावर उपस्थित असून सुद्धा ते आपल्या टेबलवर दिसत नाहीत. दिवसभर प्रतीक्षा करूनही त्यांना काम न होता निघून जावे लागते. पंचायत समिती अंतर्गत बांधकाम, आरोग्य, कृषी, शिक्षण यासारखे विभाग आहेत. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकाला अकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.याबाबत त्याठिकाणी उपस्थित एका अधिकाऱ्याला विचारणा केली असता, अनेक कर्मचारी बाहेर काम आहे, असे सांगून निघून जातात. वरिष्ठ अधिकारी कुणाकुणाकडे लक्ष देणार, ज्यांचे त्यांना कळाले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
समाधानकारक उत्तर न देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपण कारणे दाखवा नोटीस देणार असल्याचेही त्या अधिकाऱ्याने सांगितले. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी कामानिमित्त आलेल्या ग्रामस्थांनी व्यक्त केली.
दौऱ्याच्या नावाखाली कार्यालयाला दांडी
या पंचायत समितीमध्ये महत्त्वाचे प्रभाग म्हणजे कृषी, पंचायत, बांधकाम, शिक्षण, रोजगार हमी, बालविकास प्रकल्प, आरोग्य असे महत्त्वाचे प्रभाग आहे. या प्रभागाच्या अधिकारी ग्रामीण भागाचे जनजागूतीसाठी काही दौरे काढतात. त्याचाच फायदा घेवून येथील कर्मचारी नेहमीच विविध कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने कार्यालयाला दांडी मारतात. त्यामुळे कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांची दमछाक होत असल्याचे दिसून आले. त्यात त्यांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतो.
सभापतीला कार्यालयीन वाहन नाही
या पंचायत समितीची सभापती इंदू प्रकाश नन्नावरे यांचे स्वत:चे कार्यालयीन वाहन नसल्याचे त्यांनी बोलून दाखविले. गेल्या कित्येक वर्षांपासून सभापतीच्या नावाने वाहन न मिळाल्याने येथील आजी,माजी, सभापतीनीं संवर्ग विकास अधिकारी, जिल्हा परिषदेकडे लेखी तक्रारी केल्या. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. परिणामी सभापतीला अधिकाऱ्यांच्या वाहनावर अवलंबून राहावे लागत असल्याने ग्रामीण भागातील समस्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा परिषदेने याकडे लक्ष देण्याची अपेक्षा आहे.
६२ वर्षांपासून पं.स.ची अवस्था जैसे थे
पंचायत समितीची स्थापना २१ आॅक्टोबर १९५३ मध्ये झाली. तेव्हापासून या ईमारतीची अवस्था जैसे थे आहे. गेल्या कित्येक दिवसापासून या कार्यालयाची रंगरंगोटी नाही. सूचना फलकाचीही दुरावस्था झाली आहे. कार्यालयीन परिसरात नेहमीच पाणी साचून असते. येथील शिक्षण विभाग, कृषी, बालविकास, आरोग्य हे विभाग स्वतंत्र्यरित्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण नागरिकांच्या नजरेत पडत नाही. काही प्रभागाला त्या प्रभागाची नावेसुद्धा नाही. त्यामुळे कित्येक तास नागरिकांना ताटकळत राहावे लागते.

Web Title: Bhadravati Panchayat Committee on the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.