प्रशासकीय मूल्यमापनात भद्रावती नगरपरिषद प्रथम

By Admin | Updated: March 26, 2016 00:43 IST2016-03-26T00:43:09+5:302016-03-26T00:43:09+5:30

नागपूर विभागातील ६७ नगरपरिषदांच्या प्रशासकीय कामकाजाचे नुकतेच मुल्यमापन करण्यात आले.

Bhadravati Nagarparishad first in administrative evaluation | प्रशासकीय मूल्यमापनात भद्रावती नगरपरिषद प्रथम

प्रशासकीय मूल्यमापनात भद्रावती नगरपरिषद प्रथम

अधिकाऱ्यांचा सत्कार : विभागातील ६७ नगरपरिषदांचे मूल्यमापन
भद्रावती: नागपूर विभागातील ६७ नगरपरिषदांच्या प्रशासकीय कामकाजाचे नुकतेच मुल्यमापन करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक गुण मिळवून भद्रावती नगरपरिषदेने नागपूर विभागातून प्रथम क्रमांक पटकाविला.
प्रधान सचिव नगरपरिषद संचालनालय वरळी मुंबईच्या आदेशान्वये विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर यांच्या मार्फत एका नगरपरिषदेचे मुल्यमापन दुसऱ्या नगरपरिषदेने केले. या मुल्यांकनात ६७ नगरपरिषदांमधून सर्वाधिक गुण मिळवत भद्रावती नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकाविला. १०० पैकी ६८.५ टक्के गुण भद्रावती नगरपरिषदेला मिळाले. स्वच्छ भारत मिशनमध्ये घनकचरा व्यवस्थापन, प्लॉस्टीक बॅग निर्मूलन, घरोघरी शौचालय, यासाठी २० पैकी १९ गुण प्राप्त झालेत. आॅडीट रिपोर्ट तसेच शासनाला वेळेवर माहिती पाठविणे, यासाठी प्रत्येकी पाच-पाच गुण मिळाले. ई गव्हर्नरसाठी पाचपैकी पाच गुण मिळाले.
यासोबतच द्वि नोंद लेखापद्धती, कर जमा करणे, युजर चार्जस, शासकीय निधी वेळेत खर्च करणे, रोजगार निर्मितीमधून नागरी उपजिवीका अभियान याबाबत मूल्यमापन करून भद्रावती नगर परिषदेला प्रथम क्रमांक देण्यात आला.
विभागीय आयुक्त नागपूर यांच्यावतीने सदर घोषणा करण्यात आली. नागपूर विभागातील ६७ नगरपरिषदांमधून प्रथम भद्रावती नगरपरिषद, द्वितीय वरोरा नगरपरिषद, तर तृतिय राजुरा नगरपरिषदेला क्रमवारी स्थान देण्यात आले. यानिमित्ताने भद्रावती नगरपरिषदेच्या सभागृहात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्षांच्यावतीने येथील मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव, नगरसेवक झाडे, तसेच नगर परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

भद्रावती नगरपरिषदेला विभागातून प्रथम क्रमांक मिळणे, ही भद्रावतीकरांसाठी आनंदाची बाब आहे. स्वच्छतेसोबतच इतरही बाबतीत विभागातून नव्हे तर राज्यातूनही भद्रावती नगरपरिषद प्रथम क्रमांकावर रहावी, हा मानस आहे. यासाठी सर्वांची साथ आवश्यक आहे.
-अनिल धानोरकर,
नगराध्यक्ष, भद्रावती

कामकाज पद्धतीत आणखी सुधारणा करून आयएसओ नामांकनासाठी प्रयत्न करणार आहोत. जास्तीत जास्त सेवा नागरिकांना आॅनलाईन पुरविण्यात येईल. बांधकाम परवानगी आॅनलाईन पद्धतीने देण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. १ एप्रिलपासून याला सुरूवात होत आहे.
-विनोद जाधव
नगरपरिषद भद्रावती,

Web Title: Bhadravati Nagarparishad first in administrative evaluation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.