भद्रावतीत जोधपूर - चेन्नई एक्स्प्रेसला लाल झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:13 IST2019-02-24T23:13:40+5:302019-02-24T23:13:59+5:30
भद्रावती शहराचे ऐतिहासिक महत्त्व तथा येथील पर्यटक, कामगार व प्रवाशांची संख्या लक्षात घेता भद्रावती रेल्वे स्थानकावर चेन्नई - जोधपूर या एक्स्प्रेसचा थांबा मंजूर करण्यात आला. आज रविवारी सकाळी ६.३४ वाजता सदर रेल्वेगाडीचे भांदक स्थानकावर आगमन झाले. त्यावेळी शहरातील नागरिकांनी तिचे जोरदार स्वागत केले.

भद्रावतीत जोधपूर - चेन्नई एक्स्प्रेसला लाल झेंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : भद्रावती शहराचे ऐतिहासिक महत्त्व तथा येथील पर्यटक, कामगार व प्रवाशांची संख्या लक्षात घेता भद्रावती रेल्वे स्थानकावर चेन्नई - जोधपूर या एक्स्प्रेसचा थांबा मंजूर करण्यात आला. आज रविवारी सकाळी ६.३४ वाजता सदर रेल्वेगाडीचे भांदक स्थानकावर आगमन झाले. त्यावेळी शहरातील नागरिकांनी तिचे जोरदार स्वागत केले.
सदर एक्स्प्रेस आठवड्यातून रविवारी चेन्नईवरून जोधपूरकडे जाताना सकाळी ६.३४ वाजता तर जोधपूरवरून चेन्नईला ती मंगळवारी रात्री १.५६ वाजता येथे थांबेल. भद्रावती शहर हे ब वर्ग नगरपालिकेचे शहर असून शहरात हिंदू, जैन, बौद्ध या धर्माचे नागरिक वास्तव्यास आहेत. अनेक पौराणिक मंदिर आहेत.
तसेच भद्रावती या शहराला महाराष्टÑ शासनाची क वर्ग पर्यटन शहर म्हणून घोषित केलेले आहे.
येथे देशात प्रसिध्द आयुनिर्माणी दारू गोळा कारखाना, वेकोलिच्या अनेक कोळसा खाणी, एनटीपीसी यासारखे मोठमोठे कारखाने असल्यामुळे येथे कार्यरत असणारे कर्मचारी हे देशातील विविध राज्यामधून आलेले आहेत. वास्तव्यास असताना येथे पुरेशा गाड्यांचा थांबा नसल्यामुळे त्यांना नागपूर किंवा बल्लारपूर येथे जावे लागत होते. यात त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेकदा मोठी समस्या उदभवत असल्याने बाहेर राज्यातील प्रवासी कमालीचे त्रस्त झाले आहेत.
त्यांची अडचण लक्षात घेता माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार व नगरसेवक तथा भाजपाचे शहर महामंत्री प्रशाांत डाखरे यांच्या नेतृत्वात सुपर फास्ट गाड्यांचा थांबा द्यावा, यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्याकडे निवेदन देवून त्याचा सतत पाठपुरावा केला.
ना. अहीर यांनी दखल घेत प्रयत्न चालविले व या गाडीचा थांबा मिळवून दिला. या गाडीचे स्वागत करण्यासाठी भाजपाचे जिल्हा महामंत्री राहुश सराम, डॉ. भलमे, माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, नगरसेवक प्रशांत डाखरे, प्रतिभा निमकर, प्रविण सातपुते, इम्रान खान, किशेर गोवारदिपे, पवन हुरकट,दिनेश लुतावत, गोलेच्छा, बाळू उपलेचिंवार, गोविंद बिंजवे, कमलेश दातारकर, मधुकर सावनकर,माधव बांगडे तथा नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.