सचिन सरपटवार भद्रावतीभद्रावती तालुक्यातील चंदनखेडा-मुधोली व नंदोरी-कोकेवाडा या दोन जि.प. क्षेत्रात भाजपाचे उमेदवार निवडून आलेत. तर घोडपेठ-कोंढा व माजरी-पाटाळा जि.प. क्षेत्रात दोन अपक्ष उमेदवार निवडून आले. विशेष म्हणजे, निवडून आलेले हे दोनही अपक्ष उमेदवार भाजपाचे बंडखोर उमेदवार आहेत. पंचायत समिती गणात भाजपाचे ४ गणात शिवसेना २, काँग्रेस १ तर अपक्ष उमेदवार एका पं.स. गणात विजयी झाले आहे. एकंदरीतच भद्रावती तालुका क्षेत्रात जि.प. व पं.स. वर भाजपाने आपला दबदबा निर्माण करीत विजयी दौडघौड कायम ठेवली आहे.चंदनखेडा-मुधोली जि.प. क्षेत्रात भाजपाचे मारोती गायकवाड विजयी झाले. त्यांना ३७८८ मते मिळाली. प्रतिस्पर्धी सुधीर मुडेवार (शिवसेना) या ३७७१ मते मिळाली. अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत गायकवाड यांनी मुडेवार यांचा १७ मतांनी पराभव केला. चंदनखेडा पं.स. मध्ये शिवसेनेच्या बबीता कारमेंगे (२३६२) विजयी झाल्या. त्यांनी भाजपाच्या चंद्रकला दोडके (१७३५) यांचा पराभव केला. मुधोली पं.स. गणात भाजपाचे महेश टोंगे (१५९३) विजयी झाले. त्यांनी शिवसेनेचे दिलीप मोरे (१४६८) यांचा पराभव केला.नंदोरी-कोकेवाडा जि.प. क्षेत्रात भाजपाच्या अर्चना जिवतोडे (५३८७) विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या सुरेखा खिरटकर (४१०६) यांचेवर १२८१ मतांनी विजय मिळविला. पं.स. कोकेवाडा गणात भाजपाच्या विद्या कांबळे (३७५६) यांनी शिवसेनेच्या वैशाली पाटील (२७०२) यांचेवर मात केली. अपक्ष उमेदवार निलीमा रोहणकर यांनी २ हजार ८४९ मते मिळवून आव्हान उभे केले. पं.स. नंदोरी गणात भाजपाचे प्रविण ठेंगणे (२३९९) विजयी झाले. शिवसेनेच्या भानुदास ढवस (१८५७) यांचेवर त्यांनी मात केली.घोडपेठ-कोंढा जि.प. क्षेत्रात अपक्ष उमेदवार यशवंत वाघ (४२७२) यांनी शिवसेनेच्या गंगाधर गेडाम (३३४४) यांचेवर विजय मिळविला. घोडपेठ पं.स. गणात शिवसेनेच्या अश्विनी ताजणे (३१४९) यांनी भाजपाच्या विमल निमकर (२३३१) यांचेवर विजय मिळविला. कोंढा पं.स. गणात अपक्ष उमेदवार नागो बहादे (१४७५) यांनी भाजपाच्या विजय वानखेडे (१२९३) यांना पराभूत केले. विशेष म्हणजे विजय वानखेडे हे या क्षेत्राचे जि.प. सदस्य होते. माजरी-पाटाळा जि.प. क्षेत्रात अपक्ष उमेदवार प्रविण सुर (४९६३) विजयी झाले. भाजपाचे उमेश बोढेकर (३११६) यांचेवर मात केली. माजरी कॉलरी पं.स. गणात काँग्रेसचे चिंतामन आत्राम (२००३) विजयी झाले. त्यांनी भाजपाचे प्रभाकर मडावी (९०३) यांचेवर विजय मिळविला.पाटाळा पं.स. गणात भाजपाच्या नाजुका मंगाम (३०६०) विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेच्या उषा मेश्राम (२४८) यांचेवर मात केली.
भद्रावतीत भाजपाला बंडखोरीचा फटका
By admin | Updated: February 24, 2017 01:21 IST