फुकटात जाहिरात कराल तर खबरदार !

By Admin | Updated: February 4, 2015 23:11 IST2015-02-04T23:11:44+5:302015-02-04T23:11:44+5:30

एसटी महामंडळाला प्रवाशांसोबत प्रसार, प्रचाराच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. परंतु, काही फुकटे उत्पादक आपल्या वस्तूंचा प्रचार करण्यासाठी एसटीचा आश्रय घेतात.

Beware if you advertise free! | फुकटात जाहिरात कराल तर खबरदार !

फुकटात जाहिरात कराल तर खबरदार !

चंद्रपूर : एसटी महामंडळाला प्रवाशांसोबत प्रसार, प्रचाराच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. परंतु, काही फुकटे उत्पादक आपल्या वस्तूंचा प्रचार करण्यासाठी एसटीचा आश्रय घेतात. त्यामुळे एसटी विद्रुप तरच होतेच, प्रवाशांना हे कृत्य करीत असताना विनाकारण त्रासही होतो. यापुढे फुकटात जाहिरात करणे महागात पडणार आहे. यासाठी एसटी महामंडळ विनापरवानगी जाहिराती लावणाऱ्यांना पकडून जवळच्या पोलिस ठाण्यात हवाली करणार आहे.
या संबंधीचे आदेश काढण्यात आले असून त्यावर सरकारी मालमत्ता विद्रुप केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे. ‘लोकमत’ ने एसटी बसगाड्याचे विद्रुपीकरण थांबणार का? असे वृत्त प्रकाशित केले होते. यासाठी आगाराने खास पथकाची निर्मिती केली आहे. पथक प्रत्येक तालुक्यात जाऊन एसटी बसची पाहणी करेल. जाहिरातीच्या उत्पादकाचा तपशील घेतील. विनापरवाना कृत्य केल्यास त्याला दंड ठोठावणार आहे.
राज्य एसटी महामंडळ ग्रामीण भागापर्यंत वाहतुकीची सेवा देते. हाच धागा पकडून फुकटे उत्पादक आपल्या उत्पादनाची जास्तीत जास्त माहिती पोहोचविण्यासाठी एसटी हाच एकमेव पर्याय मानतात. यामधून एसटी महामंडळाचे लाखोंचे नुकसान होते. बसमध्ये फक्त परवानगी घेतलेल्यांनाच जाहिराती लावण्याचा अधिकार आहे. त्यात शासनाच्या जाहिराती या योजनेची माहिती देण्यासाठी असतात. बसेसमध्ये जाहिराती लावण्यापूर्वी परवानगी बंधनकारक आहे. परंतु, आता कुठल्याही प्रकारची हयगय करण्यात येणार नाही, अशी माहिती आगार व्यवस्थापक यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Beware if you advertise free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.