आयएमएतर्फे ‘बेटी बचाव व बेटी पढाओ’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:20 IST2019-01-05T21:20:39+5:302019-01-05T21:20:55+5:30
आयएमएतर्फे राबविण्यात आलेल्या बेटी बचाव, बेटी पढाओ या मोहिमेत जेसीआय गरिमाने सहभाग घेत मिरवणूक काढून जनजागृती केली.

आयएमएतर्फे ‘बेटी बचाव व बेटी पढाओ’ मोहीम
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आयएमएतर्फे राबविण्यात आलेल्या बेटी बचाव, बेटी पढाओ या मोहिमेत जेसीआय गरिमाने सहभाग घेत मिरवणूक काढून जनजागृती केली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे महापौर अंजली घोटेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून जेसीआय गरिमाच्या माजी अध्यक्ष प्रा. डॉ. राजश्री मार्कंडवार, सचिव मंजुषा हलकारे, मोकिक जैन, रोशनी पुगलिया, निधी टंडन, प्रतिभा बजाज, राधा बियाणी, नम्रता रांधड, निर्मल जाजू, चांडक, शिल्पा काशीया, नियाज शेख, मंजुषा पाजलवार आदी उपस्थित होते.
सदर मिरवणुकीमध्ये जेसीआय गरिमाच्या सदस्यांनी विविध राज्यातील वेशभुषा परिधान केली होती. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शर्मिली पोद्दार आणि डॉ. ऋतुजा मुंधडा यांनी केले. यावेळी जेसीआय गरिमाच्या सदस्य उपस्थित होते.