दुग्धव्यवसाय स्वंयरोजगारासाठी उत्तम पर्याय: मदने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 23:48 IST2018-01-19T23:47:38+5:302018-01-19T23:48:05+5:30
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ असतानादेखील आत्महत्या होत आहेत.

दुग्धव्यवसाय स्वंयरोजगारासाठी उत्तम पर्याय: मदने
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतकरी हा देशाचा आधारस्तंभ असतानादेखील आत्महत्या होत आहेत. अशा घटना टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला दुग्धव्यवसायाची जोड द्यावी, असे प्रतिपादन डॉ. शैलेश मदने यांनी केले. अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन आवारपूर व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती कोरपनाच्या वतीने कोरपना, राजुरा व जिवती येथील जागृती शिबिरात ते बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून अल्ट्राटेकचे इलेक्ट्रीक विभाग प्रमुख वेनु गोपालराव, उपमहाव्यवस्थापक कर्नल दीपक डे, सुरक्षा विभाग प्रमुख देवांगन, नाबार्डचे विकास अधिकारी आजीनाथ तेले, बँक आॅफ इंडियाचे मनोहर शेंडे, प्रमोद घरोटे, पशुधन विकास विस्तार अधिकारी डॉ. बाळासाहेब डाखोरे, अल्ट्राटेकचे विद्युत व्यवस्थापक प्रवीण जगताप आदी उपस्थित होते.
डॉ. मदने यांनी महाराष्ट्र शासनाचे दुग्धव्यवसाय विस्तार तज्ज्ञ असून अमेरिकेतील न्युयार्क येथील फेलोशिपप्राप्त अभ्यासक आहेत. नाबार्डअंतर्गत विविध योजनांची माहिती आजीनाथ तेले आणि बँक आॅफ इंडियाच्या कर्जाची माहिती मनोहर शेंडे व प्रमोद घरोटे यांनी दिली. विद्युत सप्ताहनिमित्त विद्युत सुरक्षा प्रवीण जगताप यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अल्ट्राटेकचे उपमहाव्यवस्थापक कर्नल डे, तर संचालन संजय पेठकर यांनी केले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.