चंद्रपूर: बंगाली समाज एकता बहुउद्देशीय संस्थेला सामाजिक न्याय विभागाच्यावतीने यावर्षीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार यावेळी पुणे येथे महात्मा फुले सभागृह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री बागडे व समाज कल्याण आयुक्त पीयुष सिंह आदी उपस्थित होते. बंगाली समाज एकता बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने अध्यक्ष अतिमकुमार बिस्वास व सचिव बिमल शाहा यांनी पुरस्कार स्वीकारला. (प्रतिनिधी)
बंगाली संस्थेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार
By admin | Updated: August 26, 2016 00:54 IST