२६० निराधारांना अनुदानाचा लाभ

By Admin | Updated: August 26, 2015 00:48 IST2015-08-26T00:48:43+5:302015-08-26T00:48:43+5:30

संजय गांधी योजना समितीची सभा तहसीलदार यू. जी. वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली.

Benefits of subsidy to 260 dependents | २६० निराधारांना अनुदानाचा लाभ

२६० निराधारांना अनुदानाचा लाभ

सभा : चामोर्शी तहसील कार्यालय
चामोर्शी : संजय गांधी योजना समितीची सभा तहसीलदार यू. जी. वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पार पडली. या सभेत २६० निराधार लाभार्थ्यांचे अनुदानाचे अर्ज मंजूर केले. त्यामुळे पुढील महिन्यापासून त्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे १०९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८२ अर्ज मंजूर करण्यात आले. तर २७ अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेची आठ प्रकरणे मंजूर झाले. ती सर्वच प्रकरणे मंजूर करण्यात आली. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे (नॉन बीपीएल) १९१ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी १०८ अर्ज मंजूर तर ८३ अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेचे (बीपीएल) १६१ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी ६२ अर्ज मंजूर तर ९९ अर्ज नामंजूर करण्यात आले.
महसूल विभागाच्या मार्फतीने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, आम आदमी विमा योजना, शिष्यवृत्ती योजना यासारख्या अनेक योजना राबविल्या जात असून या योजनांचा सामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार यू. जी. वैद्य यांनी केले. (शहर प्रतिनिधी)

 

Web Title: Benefits of subsidy to 260 dependents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.