श्रावणबाळ योजनेच्या लाभापासून लाभार्थी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:29 IST2021-04-02T04:29:22+5:302021-04-02T04:29:22+5:30

चिमूर : आयुष्याच्या उतरत्या काळात अनेकांना शासनाच्या निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेचा आधार असतो. मात्र मागील काही महिन्यांपासून चिमूर ...

Beneficiaries deprived of benefits of Shravanbal Yojana | श्रावणबाळ योजनेच्या लाभापासून लाभार्थी वंचित

श्रावणबाळ योजनेच्या लाभापासून लाभार्थी वंचित

चिमूर : आयुष्याच्या उतरत्या काळात अनेकांना शासनाच्या निराधार, श्रावणबाळ, वृद्धापकाळ योजनेचा आधार असतो. मात्र मागील काही महिन्यांपासून चिमूर तालुक्यात श्रावणबाळ योजनेचे अनुदान थकबाकी असल्याने लाभार्थ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

चिमूर तहसील अंतर्गत येणारे श्रावणबाळ, वृद्धापकाळ, योजनेचा लाभ मागील काही महिन्यांपासून थकीत आहे. त्यामुळे अनेक वृद्धांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लाभासाठी अनेक लाभार्थी प्रशासकीय कार्यालयात तसेच बँकांमध्ये चकरा मारत आहेत. मात्र रक्कम न आल्याने आल्यापावली त्यांना परत जावे लागत आहे. श्रावणबाळ योजनेचे अनुदान त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, याकरिता विनोद उमरे यांनी गुरुवारी तहसीलदार संजय नागतिलक यांना निवेदन दिले आहे.

तहसीलदार यांनी निवेदनाची दखल घेत सोमवारपर्यंत लाभार्थ्यांना अनुदान वितरित करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

निवेदन देताना मुरलीधर रामटेके, आदित्य कडू, स्वप्निल खोब्रागडे, सचिन घानोडे, नारायणन निखाडे, प्रशांत कडवे आदी उपस्थित होते.

Web Title: Beneficiaries deprived of benefits of Shravanbal Yojana