प्रशासनाच्या आश्वासनानंतर बेमुदत उपोषण मागे

By Admin | Updated: June 23, 2016 00:35 IST2016-06-23T00:35:58+5:302016-06-23T00:35:58+5:30

दरीनगर येधील अतिक्रमण काढून नाली बांधकाम व रस्ता बांधकाम करण्याच्या प्रमुख मागण्यांसदर्भात तेथील रहिवाशांनी १५ जूनपासून सुरु केलेले...

Behind the exemplary fast after the administration's assurances | प्रशासनाच्या आश्वासनानंतर बेमुदत उपोषण मागे

प्रशासनाच्या आश्वासनानंतर बेमुदत उपोषण मागे

गडचांदूर: चुदरीनगर येधील अतिक्रमण काढून नाली बांधकाम व रस्ता बांधकाम करण्याच्या प्रमुख मागण्यांसदर्भात तेथील रहिवाशांनी १५ जूनपासून सुरु केलेले बेमुदत उपोषण जिल्हा प्रशासनाने मूलभूत समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर मागे घेतले आहे.
बुधवारी दुपारी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय ढिवरे, उपजिल्हाधिकारी विनोद हरकंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, तहसीलदार पुष्पलता कुमरे, प्रभारी मुख्याधिकारी गिरीश बन्नोरे, ठाणेदार विनोद रोकडे, प्रशासन अधिकारी प्रकाश हिवारे, संतोष गोरे यांनी उपोषणकर्त्याची भेट घेऊन चुदरीनगरमधील नालीचे बांधकाम उद्यापासूनच सुरु करावयाचे आश्वासन दिले व अतिक्रमण सप्टेंबरनंतर काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषणकर्त्यान्ना सरबत देऊन उपोषण सोडण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अरुण निमजे, न.प. मधील राकाँचे गटनेते निलेश ताजने, शहर अध्यक्ष अरुण डोहे, नगरसेवक विजया डोहे, सुरेखा गोरे, शरद जोगी, उपोषणकर्ते बबलू रासेकर तथा इतर उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Behind the exemplary fast after the administration's assurances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.