कोळसा खाणीतील आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 22:13 IST2018-08-24T22:13:27+5:302018-08-24T22:13:43+5:30

वेकोलिच्या पैनगंगा कोळसा खाणीतील कोळसा व माती वाहतूक करणाऱ्या गोलछा असोसिएट सोपस्टोन डिस्ट्रिब्युटिंग प्रा. ली. कंपनीच्या चालक-वाहकांचे तीन दिवसांपासून सुरू असलेले काम बंद आंदोलन शुक्रवारी लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.

Behind coal block allocation | कोळसा खाणीतील आंदोलन मागे

कोळसा खाणीतील आंदोलन मागे

ठळक मुद्देलेखी आश्वासनानंतर वाहतूक सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
घुग्घुस : वेकोलिच्या पैनगंगा कोळसा खाणीतील कोळसा व माती वाहतूक करणाऱ्या गोलछा असोसिएट सोपस्टोन डिस्ट्रिब्युटिंग प्रा. ली. कंपनीच्या चालक-वाहकांचे तीन दिवसांपासून सुरू असलेले काम बंद आंदोलन शुक्रवारी लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले.
सब एरिया मॅनेजर सोनवंशी यांच्या कार्यालयात कांग्रेसचे घुग्घुस शहर अध्यक्ष राजुरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर, वेकोलि अधिकारी मनोगरण, गोलछा असोसिएटचे अधिकारी मोहसिन रजा खान कामगार यांच्यात झालेल्या सयुक्त बैठकीत १५ दिवसात मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रात्रीपासून कोळसा वाहतूक नियमित सुरू होणार होती. सदर कोळसा व माती वाहतूक करणाºया कंपनीकडून चालक-वाहकाकडून १२ तास काम घेऊन सात तासांचे वेतन दिले जाते. तसेच मानसिक छळ करीत असल्याचा आरोप चालक-वाहकांकडून करण्यात येत होता.

Web Title: Behind coal block allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.