राखीच्या पर्वावर मुनगंटीवारांनी भगिनींना दिली अनोखी ‘सुरक्षा’ भेट

By Admin | Updated: August 31, 2015 00:48 IST2015-08-31T00:48:21+5:302015-08-31T00:48:21+5:30

मंत्रिपदाचा मुकूट डोईवर घेऊन पायाला चाकं लावल्यागत मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी

On behalf of Rakhi Mungantiwar gave a unique 'safety' visit to the sisters | राखीच्या पर्वावर मुनगंटीवारांनी भगिनींना दिली अनोखी ‘सुरक्षा’ भेट

राखीच्या पर्वावर मुनगंटीवारांनी भगिनींना दिली अनोखी ‘सुरक्षा’ भेट

केंद्राच्या योजनेचा लाभ : स्नेहभावातून महिलांनी बांधली राखी
चंद्रपूर : मंत्रिपदाचा मुकूट डोईवर घेऊन पायाला चाकं लावल्यागत मतदार संघाच्या विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी रक्षा बंधनाच्या पर्वावर त्यांच्या मतदार संघातील महिला भगिनींना अनोखी भेट दिली. ही भेट स्वीकारताना उपस्थित महिलांनी त्यांच्या हाताला राखी बांधली. यातून लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्यातील नात्याला गहिरेपणाचा साज चढला.
देशात सत्ताबदल झाल्यानंतर सामान्यांच्या हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना जाहीर केल्या. त्यांपैकी गोरगरीब जनतेला सुरक्षेची हमी देणारी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना जाहीर केली. केवळ १२ रुपये भरायचे आणि दुदैवाने एखाद्या विमाधारकाचे अपघाती निधन झाले तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मिळेल, असे या योजनेचे स्वरूप आहे. रक्षा बंधनाच्या पर्वावर आपल्या मतदार संघातील भगिनींना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संपूर्ण बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात अभियान राबविले. २१ ते २९ आॅगस्ट या कालावधीत भाजपा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, पोंभूर्णा या तालुक्यातील महिलांपर्यंत पोहचून या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून विमा योजनेचे अर्ज भरून घेतले. विशेष म्हणजे, या योजनेसाठी द्यावयाची १२ रुपयांची रक्कम भाजपातर्फे भरण्यात आली आणि रक्षाबंधनाच्या पर्वावर हे अर्ज बँक अधिकाऱ्यांच्या सुपूर्द करण्यात आले. मतदार संघातील चारही तालुक्यातील प्रमुख गावांमध्ये आयोजित या कार्यक्रमांना स्वत: ना.सुधीर मुनगंटीवार यांनी भेटी दिल्या. महिलांशी संवाद साधला. यावेळी अनेक महिलांनी पुढे येऊन मुनगंटीवारांना ओवाळले. प्रेमपूर्वक त्यांच्या हाताला राखी बांधली. मुनगंटीवारांकडून मिळालेल्या या अनोख्या भेटीमुळे महिलाही भारावून गेल्यात. अनेक ठिकाणी महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली.
विशेष म्हणजे, बल्लारपूर मतदार संघाव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेला कुठेही उल्लेखनिय प्रतिसाद लाभला नाही. सुधीर मुनगंटीवारांच्या कल्पकतेचे, नियोजनबद्धतेचे हे यश आहे.
मंत्रिपदाच्या व्यस्ततेतूनसुद्धा वेळ काढून शासनाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे आपल्या मतदार संघात व्हावी व ती करताना त्याला संस्कृतीचे आणि भावनिकतेचे अधिष्ठान लाभावे, यासाठी ना.मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद असल्याच्या प्रतिक्रीया येथे व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: On behalf of Rakhi Mungantiwar gave a unique 'safety' visit to the sisters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.