स्त्रीत्व व पुरूषत्वाच्या पलीकडे जाऊन माणूस बनावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:28 IST2021-03-10T04:28:31+5:302021-03-10T04:28:31+5:30

चंद्रपूर : लोकशाही जीवनशैलीमध्ये महिलांकरिता वेगवेगळे कायदे करण्यात आले आहेत, या कायद्यामागची कारणे प्रत्येकाची अंतःप्रेरणा बनावी तसेच सर्वांनी स्त्रीत्व ...

Become a man by going beyond femininity and masculinity | स्त्रीत्व व पुरूषत्वाच्या पलीकडे जाऊन माणूस बनावे

स्त्रीत्व व पुरूषत्वाच्या पलीकडे जाऊन माणूस बनावे

चंद्रपूर : लोकशाही जीवनशैलीमध्ये महिलांकरिता वेगवेगळे कायदे करण्यात आले आहेत, या कायद्यामागची कारणे प्रत्येकाची अंतःप्रेरणा बनावी तसेच सर्वांनी स्त्रीत्व पुरुषत्व या संकल्पने पलीकडे जाऊन माणूस बनण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे आवश्यक आहे, असे मत डॉक्टर शिरिषा साठे यांनी व्यक्त केले.

महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या.

डॉ. साठे म्हणाल्या, महिलांनी जाणून आव्हाने स्वीकारावी. २०२१ च्या जागतिक महिला दिनाचं ब्रीदवाक्य देखील ‘चूज टू चॅलेंज’ हे आहे. त्या अनुषंगाने लिंग समभाव आणि महिलांचं यश साजरा करायला आपण सर्वांनी शिकले पाहिजे. सर्व कर्तृत्ववान महिला आणि त्यांच्या कर्तृत्वात समर्पण भावनेने योगदान देणाऱ्या सर्व पुरुषांनी २०२१ या महिला दिनाच्या निमित्ताने चेंज एजंट म्हणून काम करावे आणि आपल्यामधील दोन त्रुटींचा आत्मपरीक्षण करून वर्षभरामध्ये त्या त्रुटी भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत डॉ. साठे यांनी व्यक्त केले

यावेळी अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनीही मार्गदर्शन केले. आभार ब्रह्मपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी मानले. कार्यशाळेला जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Become a man by going beyond femininity and masculinity