इनरव्हील क्लबतर्फे बगीच्याचे सौदर्यींकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:29 IST2021-01-19T04:29:27+5:302021-01-19T04:29:27+5:30
चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने शास्त्रीनगर येथील बगीच्याचे सौदर्यींकरण करण्यात आले. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी सुसज्ज असे ...

इनरव्हील क्लबतर्फे बगीच्याचे सौदर्यींकरण
चंद्रपूर : इनरव्हील क्लब ऑफ स्मार्ट सिटीच्या वतीने शास्त्रीनगर येथील बगीच्याचे सौदर्यींकरण करण्यात आले. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी सुसज्ज असे मैदान तयार झाले आहे. शास्त्रीनगर परिसरात १५० कुटुंबे वास्तव्यास आहेत. येथील लहान मुलांसाठी असलेला बगीच्याची दुरवस्था झाली होती. तसेच कचरासुद्धा निर्माण झाला होता. त्यामुळे या परिसराची स्वच्छता करण्यात आली. येथे बसण्यासाठी चार बाक बसविण्यात आले. येथील मोठमोठ्या झाडांना आकार देण्यात आला. येथील झुल्याची दुरुस्ती करण्यात आली. बगीच्याची फ्लोरिंग करण्यात आली. त्यामुळे आता हा बगीचा मुलांसह मोठ्यांनादेखील फिरण्यासाठी सज्ज झाला आहे. या उपक्रमाचे उद्घाटन क्लबच्या डी. सी. मिनल राठी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी क्लबच्या अध्यक्ष कल्पना गुप्ता, सचिव शकुंतला गोयल, पीडीसी विद्या बांगडे, शाहीन शफिक, सीसी उमा जैन, आयएसओ तनुजा पटेल, कोषाध्यक्ष सुनीता जैस्वाल यांच्यासह क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.