प्रियकराकडून प्रेयसीला जबर मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:43 IST2021-02-05T07:43:40+5:302021-02-05T07:43:40+5:30

गौरव उर्फ आशिष अनिल पिंपळकर (१९), अखिलेश जाधव यांच्यावर दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रियकर ...

Beating a lover by a lover | प्रियकराकडून प्रेयसीला जबर मारहाण

प्रियकराकडून प्रेयसीला जबर मारहाण

गौरव उर्फ आशिष अनिल पिंपळकर (१९), अखिलेश जाधव यांच्यावर दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रियकर गौरव उर्फ आशिष अनिल पिंपळकर यास अटक केली आहे. सोमवारी तुकूम परिसरात राहणाऱ्या एका मुलीला तिच्या प्रियकराने आपल्या मित्राच्या मदतीने डब्ल्यूसीएल परिसरातील निर्जन ठिकाणी नेऊन तिला जबर मारहाण केली. तिला अर्धमेल्या अवस्थेत तेथेचे सोडून दोघांनीही तेथून पळ काढला. पीडित युवती मागील चार दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत भरती होती. शुक्रवारी तिला शुद्ध आल्यानंतर तिने संपूर्ण आपबिती पोलिसांसमोर कथन केली. त्या आधारावर पोलिसांनी प्रियकर व त्याच्या मित्रावर कलम ३७६, ३२४, ३२६, ३४ अन्वये गुन्हा नोंद करुन गौरव उर्फ आशिष अनिल पिंपळकर याला अटक केली. पुढील तपास दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील धुळे करीत आहेत.

Web Title: Beating a lover by a lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.