अस्वलाने दिला दोन पिलांना जन्म
By Admin | Updated: December 25, 2016 01:05 IST2016-12-25T01:05:54+5:302016-12-25T01:05:54+5:30
जिल्ह्यात वन्यप्राण्याच्या संख्येने दिवसेंदिवस वाढ होत असतानाच मूल तालुक्यातील मौजा चिरोली- कवळपेठ मार्गावरील एका छोट्या पुलाच्या खाली अस्वलाने

अस्वलाने दिला दोन पिलांना जन्म
वनविभागाने वाढविली गस्त : चिरोली कवळपेठ मार्गावरील घटना
मूल : दोन पिल्लांना जन्म दिला आहे. याठिकाणी वनविभागाने गस्त वाढविली असून वनविभागाचे वरिष्ठ अधिकारीही याठिकाणी नजर ठेवून आहे.
चिचपल्ली वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येत असलेल्या मूल क्षेत्रातील चिरोली- कवळपेठ परिसरात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणावर असल्याची चर्चा आहे. याच परिसरात काही दिवसांपूर्वी एका अस्वलाने दोन पिल्लांना जन्म दिला आहे. काही नागरिकांना ही बाब माहित होताच त्यांनी वनविभागाला माहिती दिली, वनविभागाने चौकशी करुन याठिकाणी मोठ्या प्रमाणावर गस्त वाढविली आहे, अस्वलाने पिल्लांना जन्म दिलेल्या ठिकाणाला मुख्य वनसंरक्षक शेळके, विभागीय वनअधिकारी धाबेकर यांनी भेट दिली असून अस्वलांच्या पिल्लांची काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. याठिकाणी वनविभागाने क्षेत्र सहायक एस.एन. बालपने यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त वाढविली आहे. मागील वर्षी मूल येथील रेल्वे फाटकाजवळील पुलाजवळही एका अस्वलाने दोन पिल्लांना जन्म दिला होता. यावेळी क्षेत्र सहाय्यक बालपणे यांच्या उपस्थितीत गस्त ठेवण्यात आली होती. त्यावेळी आलेल्या अनुभवाचा फायदा यावेळेस त्यांना होताना दिसून येत आहे.
सुमारे ४५ दिवसांपर्यंत याठिकाणी गस्त ठेवणे गरजेचे आहे. जोपर्यंत अस्वलाचे पिल्ले चालण्यास सक्षम होत नाही, तोपर्यंत अस्वल पिल्लांना जन्म दिलेले ठिकाण सोडत नसल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याठिकाणी गस्त ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)