शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

लाॅकडाऊन संपल्यानंतरही खबरदारी बाळगा; मुलांना बाहेर पडू देऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 5:00 AM

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. यामध्ये मृत्युदररी जास्त आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आता तिसऱ्या लाटेविषयी सर्वत्र बोलले जात असल्यामुळे लहान बालकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही संभाव्य धोका लक्षात घेता तयारी सुरू केली आहे. घरांमध्ये ज्येष्ठांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास बालकांना संसर्ग होऊ नये यासाठी त्यांच्या संपर्कात बालक येणार नाही, याची काळजी घ्यावी.

ठळक मुद्देकोरोना प्रादुर्भाव : संभाव्य लाट लक्षात घेता प्रशासनाचीही तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, यामध्ये लहान बालकांसाठी धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लहान मुलांची प्रत्येकांनी काळजी घेणे आवश्यक असून,  लाॅकडाऊनमध्ये, तसेच लाॅकडाऊन संपल्यानंतरही त्यांना घराबाहेर पडू न देता त्यांची काळजी घ्यावी, एवढेच नाही तर आजाराची काही लक्षणे आढळल्यास डाॅक्टरांकडे न्यावे, असा सल्ला बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे.जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. यामध्ये मृत्युदररी जास्त आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. आता तिसऱ्या लाटेविषयी सर्वत्र बोलले जात असल्यामुळे लहान बालकांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही संभाव्य धोका लक्षात घेता तयारी सुरू केली आहे. घरांमध्ये ज्येष्ठांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्यास बालकांना संसर्ग होऊ नये यासाठी त्यांच्या संपर्कात बालक येणार नाही, याची काळजी घ्यावी. बालकांना ताप, सर्दीसह खोकला असे लक्षणे आढळल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये, लाॅकडाऊन आहे म्हणूनच नाही तर लाॅकडाऊन संपल्यानंतरही बालकांना बाहेर नेणे टाळावे. न्यायचेच झाल्यास गर्दी नसलेल्या ठिकाणी, तसेच मास्क लावूनच बाहेर न्यावे,  तसेच सकस आहार, तसेच त्यांच्याकडे घरच्या घरी थोडाफार व्यायामही करून घ्यावा, जमल्यास बालकांना मास्क लावण्यासंदर्भात सांगावे,  सोशल डिस्टन्स तसेच कोरोना संसर्गासंदर्भात त्यांना माहिती करून द्यावी, असा सल्लाही बालरोगतज्ज्ञांनी दिला आहे. 

लस येईपर्यंत काळजी घ्यायलाच हवी

सर्दी ताप, अंगदुखी, डोक दुखण ही कोरोनाची प्राथमिक लक्षणे आहे. यातील २५ टक्के मुल रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. जर लहान मुलांना या इन्फेक्शनपासून दूर ठेवायचे असेल तर लस हेच एक प्रभावी उपाय आहे आहे. तोपर्यंत लहान मुलांना जपने आवश्यक आहे. मास्क लावण्याची सवयही बालकांना लावायला हवी.- डाॅ. अभिलाषा गावतुरे, बालरोग तज्ज्ञ, चंद्रपूर 

लहान मुलांना संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दी नसलेल्या ठिकाणी बालकांना फिरू द्यावे मात्र पालकांनी स्वत: त्यांच्यासोबत राहायला हवे. या काळामध्ये सकस आहार तसेच मुलांकडून छोटे-छोटे व्यायामसुद्धा करून घेतल्यास त्यांचे आरोग्य सुदृढ राहील. आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.-डाॅ. गोपाल मुंधडा,बालरोग तज्ज्ञ, चंद्रपूर

पालकांनी घ्यावी ही काळजीघरात वयस्क कोणी बाधित असेल तर त्यांचा बालकांशी येणारा संपर्क टाळावा.थंड पदार्थ खाण्यासाठी देऊ नयेत. सकस आहार तसेच गरम आणि ताजे अन्न द्यावे. लहान मुलांना थंड पाण्याने आंघोळ घालू नये.लहान मुलांना मास्क घालण्याची सवय लावावी, हात, पाय, स्वच्छ धुवावे, शारिरीक अंतराचे पालन करण्याचे महत्त्व त्यांना सांगावे.  फिराला नेताना पालकांनी मुलांसोबत जावे.

जिल्हा प्रशासनाने सुरु केली तयारीतिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये लहान मुलांना अधिक धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने तशी तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली असून संभाव्य धोका लक्षात घेता बालकांसाठी ऑक्सिजनयुक्त बेड तयार ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या