शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
2
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
3
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
4
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
5
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
6
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
7
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
8
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
9
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
10
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
11
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
12
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
13
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
14
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
15
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
16
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
17
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
18
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
19
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
20
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल

सावधान! जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 05:00 IST

नवीन वर्ष सुरू होताच जिल्ह्यात रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. शेजारी असलेल्या गडचिरोली तसेच नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. या जिल्ह्यात नागरिकांची सारखी वर्दळ असते. नागपूरला जाणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. सोबतच गडचिरोली येथे विद्यापीठ तसेच नोकरीनिमित्त जाणाऱ्या-येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळणे आवश्यक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. बुधवारी जिल्ह्यात पुन्हा ३१ कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने कोरोना ॲटिव्ह रुग्णांचा आकडा आता ६० वर पोहोचला आहे. दरम्यान, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वेळीच सजग होत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा पुन्हा कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. विशेष म्हणजे, शेजारी असलेल्या नागपूर तसेच गडचिरोली जिल्ह्यांतही रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे काळजीत अधिकच भर पडली आहे.नवीन वर्ष सुरू होताच जिल्ह्यात रुग्णसंख्या हळूहळू वाढत आहे. शेजारी असलेल्या गडचिरोली तसेच नागपूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत आहे. या जिल्ह्यात नागरिकांची सारखी वर्दळ असते. नागपूरला जाणाऱ्यांचीही संख्या अधिक आहे. सोबतच गडचिरोली येथे विद्यापीठ तसेच नोकरीनिमित्त जाणाऱ्या-येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळणे आवश्यक आहे. शेजारील  जिल्ह्यातील रुग्णसंख्याही चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांची काळजी वाढविणारी आहे.कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यात ८ लाख ३ हजार ४०६ तपासणी करण्यात आली असून  यातील ७ लाख १३ हजार ५० नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५४५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वेळीच सर्तक राहणे गरजेचे आहे.

निर्बंध नको असेल तर नियमांचे पालन करा

कोरोनाचा संसर्ग जिल्ह्यात वाढत आहे, मात्र नागरिकांकडून नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मास्कचा वापर करणे देखील अनेक जण टाळत आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि कार्यक्रमांना गर्दी करीत आहेत. यामुळे संसर्गात पुन्हा वाढ होऊन कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. निर्बंध नको असेल तर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी आणि कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी टाळणे आवश्यक आहे.

नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा. स्वत:ची काळजी घ्यावी, तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावर जाऊन कोरोनाची लस घ्यावी.-अजय गुल्हाने जिल्हाधिकारी, चंद्रपूर

वेळीच व्हा दक्षबुधवारी आढळलेल्या बाधित रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात २४, बल्लारपूर २, राजुरा २, चंद्रपूर १, भद्रावती १, तर  चिमूर येथे एक रुग्ण आढळून आला. ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, वरोरा, कोरपना, जिवती व इतर  ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर येथील एका महिलेचा समावेश आहे. चंद्रपूर महापालिका क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या