सावध व्हा! कोरोना कहर सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:29 IST2021-04-01T04:29:24+5:302021-04-01T04:29:24+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २७ हजार ७५२ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २५ हजार २७० ...

सावध व्हा! कोरोना कहर सुरूच
जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २७ हजार ७५२ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २५ हजार २७० झाली आहे. सध्या २ हजार ६१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ७३ हजार ७५० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख ४२ हजार १४४ नमुने निगेटिव्ह आले. २०८ जणांनी कोरोनावर मात केल्याने रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपुरातील बाबूपेठ येथील ५८ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२६ बाधितांचे मृत्यू झाले यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३६८, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २०, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
आज आढळलेले रूग्ण
चंद्रपूर मनपा क्षेत्र १००
चंद्रपूर तालुका ३४
बल्लारपूर २४
भद्रावती ०७
ब्रम्हपुरी ३२
नागभीड ३४,
सिंदेवाही ०३
मूल ०१
गोंडपिपरी ०५
राजूरा ०७
चिमूर ०९
वरोरा ०६
कोरपना १३
जिवती ०१
अन्य ०४
बल्लारपूर तहसील कार्यालयात नियंत्रण कक्ष
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या निर्देशावरून तहसील कार्यालय बल्लारपूर नियंत्रण कक्ष कार्यान्वित झाले. या कक्षाद्वारे कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड रूग्णालये व उपलब्ध खाटांची संख्या, गृह विलगीकरण व संस्थात्मक विलगीकरण व शासनाद्वारे वेळोवेळी निर्गमित आदेश व नियमावली, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग टिम, कोविड १९ लसीकरण केंद्रांची माहिती दिली जात असल्याचे तहसीलदार संजय राईंचवार यांनी सांगितले.