डॉक्टर्स डे निमित्त आज बी.सी. रॉय यांना आदरांजली
By Admin | Updated: July 1, 2015 01:17 IST2015-07-01T01:17:02+5:302015-07-01T01:17:02+5:30
इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने डॉक्टर्स डेनिमित्त बुधवारी १ जुलै रोजी भारतरत्न डॉ.बी.सी.रॉय यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

डॉक्टर्स डे निमित्त आज बी.सी. रॉय यांना आदरांजली
चंद्रपूर: इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने डॉक्टर्स डेनिमित्त बुधवारी १ जुलै रोजी भारतरत्न डॉ.बी.सी.रॉय यांना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
स्थानिक प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात सायंकाळी ७.३० वाजता आयोजित या कार्यक्रमाला अतिथी म्हणून केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आयएमएचे राज्याध्यक्ष डॉ.टी.सी.राठोड, मेळघाट येथील आदिवासी आरोग्य संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ.आशिष सातव उपस्थित राहतील. भारतरत्न डॉ.बिधानचंद्र रॉय यांच्या वैद्यकीय व्यवसायाप्रती असलेल्या समर्पणवृत्तीच्या सन्मानार्थ १ जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून देशभर साजरा केला जातो. डॉ.रॉय हे ९४ वर्षे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. विद्यापिठाचे कुलगुरू, विधिमंडळ सदस्य, संसद सदस्य अशा पायऱ्या चढत ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचले. मात्र त्यांची वैद्यकीयसेवा अखंड सुरू होती. ३ फेब्रुवारी १९६१ रोजी त्यांना भारतरत्न बहाल करून गौरव करण्यात आला. डॉ.रॉय यांचा जन्म आणि मृत्यूदिन हा १ जुलैच आहे. या दिवशी वैद्यकीय क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल डॉ.बी.सी.रॉय अवॉर्डदेखील दिला जातो. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती आयएमएचे अध्यक्ष डॉ.अशोक भुक्ते व सचिव डॉ.प्रसाद पोटदुखे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)