नुकसान भरपाईसाठी बँकेत चकरा

By Admin | Updated: May 30, 2015 01:42 IST2015-05-30T01:42:21+5:302015-05-30T01:42:21+5:30

राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांची परवड अजूनही थांबली नसून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे खात्यात शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अद्याप जमाच झाली नसल्याने ...

BANK AT BANK FOR COMPENSATION | नुकसान भरपाईसाठी बँकेत चकरा

नुकसान भरपाईसाठी बँकेत चकरा

१५ दिवसांत रक्कम द्या : तहसील कार्यालयापुढे ठिय्या आंदोलनाचा इशारा
चंद्रपूर: राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांची परवड अजूनही थांबली नसून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे खात्यात शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई अद्याप जमाच झाली नसल्याने शेतकऱ्यांना बुरे दिन बघावयास मिळत आहेत.
यावर्षी झालेला कमी पाऊस व त्यातच काही दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस व अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतीव्यवसाय व शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून वारंवार मागणी झाल्यावर राज्यातील सत्तारुढ भाजप- शिवसेना सरकारने नुकसान भरपाई जाहीर केली. मात्र राजुरा तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी बँकेकडे पाठिवताना शेतकऱ्यांच्या नावांत प्रचंड चुका आहेत, काहींचे खाते क्रमांक बरोबर असले तरी बँकेचे नाव चुकीचे आहे. काही शेतकऱ्यांचे नावापुढे बँक खात्याचा उल्लेखच नाही तर संयुक्त नावाने असलेल्या शेतीची रक्कमही तशीच पडून आहे. या कारणांमुळे शेतकऱ्यांचे बँक खात्यात जमा न करण्यात आलेल्या रक्कमेचा डीडी तहसील कार्यालयाकडे अडीच महिन्यांपूर्वीच परत पाठविण्यात आला. मात्र अद्याप सुधारीत यादी बँकेकडे पाठविण्यात आलेली नसल्याने लवकरच सुरु होणाऱ्या शेतीचे हंगामाकरिता ही रक्कम उपयोगी येईल या आशेने पदरमोड करुन बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना तुमची रक्कम तहसील कार्यालयातून आली नाही असे उत्तर मिळते. तर तहसील कार्यालयात आल्यानंतर या शेतकऱ्यांना बँकेत पैसे पाठविल्याचे सांगण्यात येते. यामुळे हवालदिल झालेला कास्तकार बँक ते तहसील कार्यालय अशा चकरा मारत आहे. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन राजुरा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष दादा पाटील लांडे यांनी राजुराचे तहसीलदार यांची भेट घेवून निवेदन दिले. तथा १५ दिवसांत हा प्रश्न निकालात न काढल्यास तहसील कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. लांडे यांचे नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळातत उमाकांत धांडे, अशोक देशपांडे, डॉ. उमाकांत धोटे, कर्णेवार, हेमंत झाडे, लक्ष्मणराव एकरे, रवींद्र चटके, दौलतराव घटे, सुरेश पोडे आदींचा सामवेश होता. (शहर प्रतिनिधी)

Web Title: BANK AT BANK FOR COMPENSATION

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.