वेशभूषा आंदोलनाचे आकर्षण : आंदोलनस्थळी महिलांच्या पारंपारिक वेशभुषांचीच चर्चासंघरक्षित तावाडे जिवतीवेगळा विदर्भ राज्याची मागणी आता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून संपूर्ण देशात या मागणीची व आंदोलनाची चर्चा होत आहे. यासाठी वैदर्भियांनी आंदोलने सुरु केली. यात वैदर्भीय जनता मागे नाही. मंगळवारी नागपूर येथे झालेल्या आंदोलनात पुरुषांसह महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. यात जिवती तालुक्यातील बंजारा समाजातील महिलांचाही समावेश होता. त्यांनी परिधान केलेली पारंपारिक वेशभुषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.विदर्भातील शेवटचे टोक तेलंगणा सीमेवरील जिवती तालुक्यातील बंजारा समाजाच्या महिला स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी अत्यंत आग्रही असल्याचे यावेळी दिसून आले. आपली पारंपारिक वेशभूषा परिधान करुन त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. विदर्भ राज्य प्रत्येकाला हवे आहे, विदर्भ राज्य ही काळाची गरज आहे, हे या माताभगीनींनी दाखवून दिले आहे. बंजारा समाजातील महिलांसोबतच जिवती तालुक्यातील अनेक महिलाही या आंदोलनात आवर्जुन सहभागी झाल्या. यावरून त्यांच्यातील वेगळ्या विदर्भाची कनव दिसून येत आहे.९ आॅगस्ट क्रांतीदिनाचे औचित्य साधून वेगळा विदर्भ राज्याच्या मागणीसाठी नागपूर येथे हे आंदोलन ठेवण्यात आले होते.मागे झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान ना. नितीन गडकरी यांनी वेगळा विदर्भ राज्य अशी भाषा वापरली होती. आणि त्याचीच आठवण करुन देण्यासाठी ना. गडकरी यांच्या घरासमोरील नियोजित आंदोलनात जिवती तालुक्यातील या बंजारा महिलांबाबत व त्यांच्या वेशभुषेबाबत सर्वत्र चर्चा केली जात होती, हे येथे उल्लेखनीय. तेलंगणाच्या घुसखोरीपेक्षा विदर्भ बरामंगळवारच्या नागपूर येथील आंदोलनात जिवती येथील बंजारा समाजातील महिला विशेषत्वाने सहभागी झाल्या. याला कारणही तसेच आहे. जिवती तालुक्यातील १४ गावे हे तेलंगणा - महाराष्ट्र दोन्ही राज्यात आहेत. दोन्ही राज्याच्या कचाट्यात या गावांचा विकास खुंटला आहे. या १४ गावात तेलंगणा राज्य नेहमी सोईसुविधा किंवा योजना देऊन घुसखोरी करत असते. विदर्भ राज्य झाल्यास या दोन्ही राज्याच्या कचाटातून ही १४ गावे मुक्त होईल. त्यामुळे विदर्भ राज्य बरा, असे मानत या महिला आंदोलनात गेल्या होत्या.विदर्भ राज्याने जात प्रमाणपत्र तरी निघेलचंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात वसलेले लोक हे विषेशकरुन मुळ मराठवाड्यातील आहेत. पण ही जनता येथे येऊन ३५-४० वर्षे झालीत. आता त्यांच्या मुलांचे जात प्रमाणपत्र काढताना अनेक अडचणी येत आहेत. मराठवाड्यातील ज्या जिल्ह्यातील मुळ रहिवासी असतील, तेथे त्यांना जावे लागते. पण चंद्रपूर जिल्ह्याचे हल्ली रहिवासी असल्याने त्यांना परत इकडेच पाठविले जाते. दोघांच्या कचाट्यात ही जनता सापडली आहे. म्हणून वेगळा विदर्भ राज्य झाला तर कमीतकमी जात प्रमाणपत्र तरी निघेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
विदर्भ राज्याच्या आंदोलनात बंजारा महिला सरसावल्या
By admin | Updated: August 11, 2016 00:40 IST