शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

चंद्रपुरातील बांबू इमारतीची सिंगापुरातील माध्यमांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 15:53 IST

शाश्वत पर्यावरणाला अनुकूल आणि नैसर्गिक संसाधनांवर आधारित रोजगाराभिमुखतेला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपुरातील चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राची भव्य इमारत उभारण्याचे काम अहोरात्र सुरू आहे.

ठळक मुद्देभारतातील पर्यावरणपूरक इमारतींमध्ये एकमेवफ्यूचरिक मासिकात लागली वर्णी

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शाश्वत पर्यावरणाला अनुकूल आणि नैसर्गिक संसाधनांवर आधारित रोजगाराभिमुखतेला प्रोत्साहन देण्यासाठी चंद्रपुरातील चिचपल्ली येथे बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्राची भव्य इमारत उभारण्याचे काम अहोरात्र सुरू आहे. बांबूपासून निर्माण होणाऱ्या या डौलदार इमारतीची सिंगापूर देशातील माध्यमांनीही दखल घेतली. ‘द ग्रीन आर्किटेक्चर इन आशिया पॅसिफि क’ हे ब्रिद धारण करणाऱ्या पर्यावरणविषयक ‘फ्युचरिक’ या प्रसिद्ध द्वैमासिकाने जगभरातील पर्यावरणपूरक इमारतींवर विशेषांक प्रकाशित केला असून त्यामध्ये चिचपल्ली येथील बांबूवर आधारित इमारतीच्या वैशिष्ट्यांची नोंद घेतली. विशेष म्हणजे भारतातील अशा प्रकारची ही एकमेव इमारत असून २०१९ पर्यंत इमारत पूर्ण व्हावे, यासाठी दिवसरात्र बांधकाम सुरू आहे.भारतीय वन धोरणातून बांबूला मुक्त करून त्यावरील बंधने हटविण्यात आली आहेत. त्यामुळे बांबूचा वापर वाढवून त्यातून रोजगार निर्मिती आणि व्यावसायिक वृद्धी करण्याच्या धोरणांची अमलबजावणी केली जात आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा हे जिल्हे बांबूचे आगार म्हणून ओळखले जातात. त्यामुळे बांबूवर आधारीत नवनवे अभ्यासक्रम सुरू करून विद्यार्थ्यांपासून तर शेतकरी, महिलांना सामावून घेणे आणि बांबू मूल्यवर्धनाचे उपक्रम राबविणे, याकरिता चिचपल्ली येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात आली. यासाठी राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेषत्वाने पुढाकार घेतला. या केंद्रातून बांबूवर आधारित विविध प्रकारच्या रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचा विद्यार्थी लाभ घेत आहेत. मुख्य इमारतीचे बांधकाम सध्या सुरू आहे. या इमारतीसाठी सिमेंट व अन्य बांधकाम सामग्रीऐवजी केवळ बांबूचा वापर केला जात आहे. अशा प्रकारची बहुविध पर्यावरणपूरक इमारत भारतामध्ये पहिल्यांदाच उभी होत असून त्यासाठी राज्य शासनाने मुबलक निधी उपलब्ध करून दिला आहे.आशिया खंडातील सर्वात मोठी पर्यावरणपूक इमारतसिंगापुरातील ‘फ्युचरिक’ या जगप्रसिद्ध द्वैमासिकाने मार्च-एप्रिल २०१८ च्या विशेषांकात चिचपल्ली येथील बांबू इमारतीची वृत्तकथा प्रकाशित केली. शिवाय आशिया खंडातील ही सर्वात मोठी पर्यावरणपूक इमारत असल्याचा दावाही केला आहे. याच अंकात हाँगकाँग, इंडोनिशिया, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, फिलिपाईन्स, कॅनडा, जपान, चीन देशांमध्ये पर्यावरणपूरक इमारतींची विविधता कशी आहे, जगभरात या क्षेत्रात नेमके काय चालले, याचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. वनसंपदा व पर्यावरण क्षेत्रातील घडामोडींचा साक्षेपी आढावा घेणाऱ्या या द्वैमासिकाला जगभरात मोठा वाचकवर्ग आहे.जगभरासाठी आकर्षणस्थळचंद्रपुरातील चिचपल्ली येथे उभी होत असलेली बांबूची देखणी व भव्य इमारत विहित कालावधीतच पूर्ण होणार आहे. जगभरातील इमारतींचा सखोल अभ्यास केल्यानंतर या इमारतीचा नाविण्यपूर्ण आराखडा तयार करण्यात आला. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील विद्यार्थी, कार्यकर्ते व अभ्यासकांसाठी ही इमारत आकर्षणस्थळ ठरणार आहे.- राहुल पाटील, संचालकबांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र चिचपल्ली, चंद्रपूर.

टॅग्स :environmentवातावरण