दिव्यांग मतदारांना मिळणार ब्रेल लिपीतील बॅलेट पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:09 IST2019-03-23T22:08:50+5:302019-03-23T22:09:06+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अस्थिव्यंग, अंध व्यक्तींना मतदान करण्याची संधी मिळावी. याकरिता बे्रल लिपीतील बॅलेट पेपरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.

दिव्यांग मतदारांना मिळणार ब्रेल लिपीतील बॅलेट पेपर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये अस्थिव्यंग, अंध व्यक्तींना मतदान करण्याची संधी मिळावी. याकरिता बे्रल लिपीतील बॅलेट पेपरची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शुक्रवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विजय देवळीकर, सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी व प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. खेमनार म्हणाले, कोणत्याही परिस्थितीमध्ये अस्थिव्यंग व अंध असणाऱ्या मतदारांना मतदानापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने अशा मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी व्हिलचेअर उपलब्ध करून देईल. याशिवाय प्रत्येक मतदान केंद्रावर रॅमची सुविधा राहणार आहे. अंध मतदारासोबत एका व्यक्तीला मतदान केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. सर्वांना बॅलेट पेपर दिले जातील. हे बॅलेट पेपर ब्रेल लिपीत राहणार आहे. त्यामुळे त्यांना मतदान करता येईल व मतदानाची गोपनीयता अबाधित राहिल. यासंदर्भात सर्व मतदान केंद्रावर मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्याबाबत निर्देश देण्यात आले. अस्थिव्यंग व अंध मतदार व त्यांच्यासोबत मतदान केंद्रावर कशा पद्धतीची वागणूक असायला पाहिजे. याशिवाय त्यांना मतदान करताना कशा पद्धतीने मदत केली पाहिजे, या संदर्भात प्रशिक्षण होणार आहे.