रस्त्यावरील गिट्टीमुळे वाहनधारकांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:35 IST2021-02-25T04:35:44+5:302021-02-25T04:35:44+5:30

तळोधी बाः नेरी ते गांगलवाडी रस्त्याचे काम वर्षभरापासून अतिशय संथ गतीने सुरू आहे. संबंधित कंत्राटदारांकडून तळोधी ते मेंडकी ...

Ballast on the road bothers motorists | रस्त्यावरील गिट्टीमुळे वाहनधारकांना त्रास

रस्त्यावरील गिट्टीमुळे वाहनधारकांना त्रास

तळोधी बाः नेरी ते गांगलवाडी रस्त्याचे काम वर्षभरापासून अतिशय संथ गतीने सुरू आहे. संबंधित कंत्राटदारांकडून तळोधी ते मेंडकी रोडवर गिट्टी टाकून ठेवल्यामुळे वाहनचालकांना वाहन हातात घेऊन पायदळ चालावे लागते आहे. संबंधित विभागाने लक्ष घालून त्वरित रस्ता दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे.

तळोधी बा.ते मेंडकी रोडवर जागोजागी अर्धवट डांबरीकरण केलेले आहे. मेंडकी रोडवर दोन ते तीन किलोमीटरपर्यंत गिट्टी टाकली असून, गिट्टीची रोलरने दबाई न केल्याने सायकल, दुचाकी व चारचाकी या वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे, तसेच आरमोरी ते तळोधी बा.बससुद्धा रोडच्या कामामुळे बंद आहे. या मार्गावर गिट्टी टाकली असल्याने गांगलवाडी आरमोरी व गडचिरोलीकडे प्रवास करणाऱ्या लोकांना तळोधीवरून नागभीड मार्गे प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष घालून त्वरित रस्ता दुरूस्ती करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Ballast on the road bothers motorists