शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

बल्लारशाह -गोंदिया पॅसेंजरचा बल्लारपूरला डच्चू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

या गाडीच्या दीड वर्षापूर्वी दिवसातून एकाहून अधिक फेऱ्या बल्लारशाह- चांदा फोर्ट- गोंदिया यादरम्यान होत होत्या. या मार्गावरील नोकरदार, व्यावसायिक, कास्तकार व सामान्य नागरिक यांना त्या अत्यंत सोयीच्या होत्या. यामुळे सर्वच फेऱ्यांमध्ये प्रवासी तुडुंब भरून जात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २० मार्च २०२० पासून या मार्गावरील बल्लारशा - गोंदिया या दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या. दीड वर्षानंतर ही गाडी सुरू झाली. परंतु, दिवसातून एकच फेरी.

वसंत खेडेकरलोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : प्रवाशांचा रेटा, लोकप्रतिनिधींचे प्रयत्न आणि रेल्वे प्रवासी मंडळ तसेच, रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य या सर्वांच्या आग्रहाखातर सामान्य प्रवाशांच्या सोयीची असलेली आणि आर्थिकदृष्ट्या प्रवाशांना परवडणारी बल्लारशाह (बल्लारपूर) - गोंदिया ही पॅसेंजर गाडी दीड वर्षानंतर मंगळवारपासून सुरू झाली आहे. मात्र, या गाडीचा फेरा दिवसातून एकच (अप व डाऊन) एवढाच सीमित ठेवण्यात आला आहे. तद्वतच तिकीट दरांमध्ये भरमसाट (दुप्पट) वाढ केली आहे. या कारणांनी प्रवासी रेल्वे प्रशासनावर नाराज झाले. यात भरीस भर या रेल्वेगाडीचा बल्लारशाहपर्यंतचा फेरा बुधवारपासून बंद करण्यात आलेला आहे. ही गाडी आता गोंदियापासून चांदा फोर्टपर्यंत येऊन तिथूनच गोंदियाला परत जात आहे. अशाप्रकारे बल्लारपूरला डच्चू देण्यात आला आहे. बल्लारपूरची ही घोर उपेक्षा आहे.या गाडीच्या दीड वर्षापूर्वी दिवसातून एकाहून अधिक फेऱ्या बल्लारशाह- चांदा फोर्ट- गोंदिया यादरम्यान होत होत्या. या मार्गावरील नोकरदार, व्यावसायिक, कास्तकार व सामान्य नागरिक यांना त्या अत्यंत सोयीच्या होत्या. यामुळे सर्वच फेऱ्यांमध्ये प्रवासी तुडुंब भरून जात. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे २० मार्च २०२० पासून या मार्गावरील बल्लारशा - गोंदिया या दरम्यान धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या. दीड वर्षानंतर ही गाडी सुरू झाली. परंतु, दिवसातून एकच फेरी. या मार्गावरील प्रवाशांची संख्या बघता, पूर्वीसारख्याच एकाहून अधिक फेऱ्या होणे गरजेचे आणि प्रवाशांच्या सोयीचे आहे. मंगळवारी ८ डब्यांची ही गाडी बल्लारशाह स्थानकावर दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी फलाट क्रमांक एकवर येऊन पोहोचली. २ वाजून १५ मिनिटांच्या परतीच्या प्रवासात येथून ३१ प्रवासी बसलेत. ही गाडी पॅसेंजर म्हणूनच ओळखली जात असली तरी नव्याने तिला रेल्वेच्या भाषेत मेल एक्स्प्रेस असे नाव देण्यात आले आहे. म्हणूनच असावे, तिकिटाचा दर पूर्वीपेक्षा दुप्पट (पूर्वी ५० रुपये आता ९० रुपये) करण्यात आला आहे. जो सामान्य प्रवाशांना धक्का देणारा आहे.

चांदा फोर्टला प्राधान्यही पॅसेंजर नव्याने सुरू झाल्यानंतर फक्त मंगळवारलाच बल्लारशाहपर्यंत आली. बुधवारपासून फक्त चांदापर्यंत येत आहे. रेल्वे प्रशासनाकडून तसा आदेश बल्लारशाह स्थानकाकडे आला आहे. ही गाडी पूर्वीप्रमाणेच बल्लारशाहपर्यंत येणे आवश्यक आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वे