बल्लारपूरचा किंग्जस इलेवन संघ आमदार चषकाचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:43 IST2021-02-23T04:43:25+5:302021-02-23T04:43:25+5:30

बल्लारपूर : येथील काॅलरी मैदानावर झालेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत बल्लारपूर येथील किंग्जस इलेवन संघाने चंद्रपूर येथील व्हाईट ॲश ...

Ballarpur's Kings XI team MLA Cup Mankari | बल्लारपूरचा किंग्जस इलेवन संघ आमदार चषकाचा मानकरी

बल्लारपूरचा किंग्जस इलेवन संघ आमदार चषकाचा मानकरी

बल्लारपूर : येथील काॅलरी मैदानावर झालेल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेत बल्लारपूर येथील किंग्जस इलेवन संघाने चंद्रपूर येथील व्हाईट ॲश या संघाचा पराभव करून आमदार चषक पटकाविला. विजेत्या संघाला १ लाख रुपये रोख व शिल्ड, तर उपविजेत्या संघाला ५० हजार रुपये रोख व शिल्ड असे पारितोषिक देण्यात आले.

उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या खेळाडूंना व्यक्तिगत पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

ही स्पर्धा येथील एव्हरग्रीन यूथ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील एकूण १२ टिमांना यात भाग घेतला होता. या स्पर्धेचे हे चौथे वर्ष होते. पुरस्कार वितरण आमदार तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. शहरातील व्यायाम शाळा, नगर परिषद स्वच्छता विभाग, नगर सुरक्षा दल, साजिद कुरैशी (चंद्रपूर) यांनाही सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे, चंद्रपूर भाजपा शहर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मंचावर शिवचंद द्विवेदी, न.प. शिक्षण सभापती सारिका कनकम, अरुण वाघमारे, राजू दारी, येलय्या दासरप, वसंत खेडेकर, भाजपा महिला आघाडीच्या किरण बुटले, बुचय्या कंदीवार, प्रशांत विघ्नेश्वर, जुम्मन रिझवी, संतोष महेश्वरी यांचीही मंचावर उपस्थिती होती. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सतिश कनकम, संचालन नासीर खान यांनी केले. आभार सारिका कनकम यांनी मानले.

Web Title: Ballarpur's Kings XI team MLA Cup Mankari