सीएम चषक नोंदणीत बल्लारपूर राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 22:19 IST2018-12-25T22:19:25+5:302018-12-25T22:19:50+5:30
युवकांमधील कला, क्रीडा या सुप्त गुणांना चालना मिळावी, यासाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सीएम चषक स्पर्धा घेण्यात आली. तरूणाईने दिलेला उदंड प्रतिसाद उल्लेखनीय आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्र नोंदणीमध्ये राज्यात अव्वल ठरले. या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासाठी अभिमानाची बाब असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे फलित असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

सीएम चषक नोंदणीत बल्लारपूर राज्यात अव्वल
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : युवकांमधील कला, क्रीडा या सुप्त गुणांना चालना मिळावी, यासाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सीएम चषक स्पर्धा घेण्यात आली. तरूणाईने दिलेला उदंड प्रतिसाद उल्लेखनीय आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्र नोंदणीमध्ये राज्यात अव्वल ठरले. या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्यासाठी अभिमानाची बाब असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाचे फलित असल्याचे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
एकदंत लॉनमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, प्रमोद कडू, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार रामदास आंबटकर, बल्लारपूर नगराध्यक्ष हरिश शर्मा, महापौर अंजली घोटेकर, जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, काशीसिंह, शिवचंद द्विवेदी, निलेश खरबडे, रेणुका दुधे यांची उपस्थिती होती.
यावेळी सीएम चषक स्पर्धेत बल्लारपूर विधानसभा क्षेत्राअंतर्गत चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभुर्णा व मुल तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या विविध क्रिडा स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी रांगोळी, चित्रकला, गीत गायन व नृत्य स्पर्धा झाली.
परीक्षण डॉ. जयश्री कापसे, मनीषा बोनगीरवार-पडगीलवार, सुशिल सहारे यांनी केले. रांगोळी स्पर्धेत सुहास दुधलकर प्रथम, गीत गायन स्पर्धेत ऊर्जानगरची समृद्धी इंगळे प्रथम, प्रशांत शामकुंवर यांना द्वितीय, कुमुद रायपुरे यांना तृतीय तर विक्की दुपारे व नम्रता श्रीरामे यांना प्रोत्साहनपर, समुह नृत्य स्पर्धेत आरडी ग्रुप बल्लारपूर यांना प्रथम, नवरंग डान्ॅस ग्रुप बल्लारपूर यांना द्वितीय, धारवी ग्रुप पोंभुर्णा यांना तृतीय तर जय भवानी ग्रुप व सातारा भोसले ग्रुप यांना प्रोत्साहनपर देण्यात आला.
एकल नृत्य स्पर्धेत प्रियंका कोरे प्रथम, प्रेरणा सोनारकर द्वितीय, शितल कुमरे तृतीय, चित्रकला स्पर्धेत अ गटात वंशिता मुलचंदानी प्रथम, प्रियांशु पांडे द्वितीय, खुशी उमरे तृतीय, चित्रकला स्पर्धेत ब गटात सुदर्शन बारापात्रे प्रथम, गरिमा गुप्ता बल्लारपूर द्वितीय, शुभम येवतकर मुल तृतीय आदींना देण्यात आला. संचालन प्रज्वलंत कडू यांनी केले. अॅड. रणंजयसिंह, सुरज पेदुलवार आदींसह अन्य सहकारी उपस्थित होते.