१० ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी गजबजणार बल्लारपूर तहसील कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:26 IST2021-01-18T04:26:21+5:302021-01-18T04:26:21+5:30

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील १० ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे परिणाम सोमवारी घोषित होणार असून, मतमोजणीचे काम तहसील कार्यालय परिसरातील उपविभागीय ...

Ballarpur tehsil office will be crowded with 10 Gram Panchayat candidates | १० ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी गजबजणार बल्लारपूर तहसील कार्यालय

१० ग्रामपंचायतीच्या उमेदवारांनी गजबजणार बल्लारपूर तहसील कार्यालय

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील १० ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे परिणाम सोमवारी घोषित होणार असून, मतमोजणीचे काम तहसील कार्यालय परिसरातील उपविभागीय कार्यालयात होणार आहे. त्या निमित्ताने तालुक्यातील दहाही ग्रामपंचायतींच्या उमेदवारांनी तहसील कार्यालय गजबजणार असून, विजेत्यांचे स्वागत करण्याची तय्यारी पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.

मागील एक महिन्यापासून बल्लारपूर तालुक्यातील हडस्ती, नांदगाव पोडे, विसापूर, कळमना, कोर्टीमकता, आमडी, पळसगाव, किन्ही, मानोरा, गिलबिली गावात निवडणुकीचे वारे वाहत होते. सर्व गावकरी आपल्या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी धडपड करीत होते. यामुळे कमी मतदार असलेल्या ग्रामपंचायत हद्दीत मतदारांनी भरभरून मतदान केले. विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यासाठी मतदार आज, सोमवारी तहसील कार्यालयाजवळ गर्दी करणार आहे. संजय राईंचवार यांच्या माहितीनुसारही मतमोजणी १० फेऱ्यांत आटोपणार असून, त्यासाठी चार टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी कोविड नियमाचे पालन करून व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.

Web Title: Ballarpur tehsil office will be crowded with 10 Gram Panchayat candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.