बल्लारपूर तालुक्यात ७०६ मतदारांची नोटाला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:06+5:302021-02-05T07:37:06+5:30

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना पसंती न देता ७०६ मतदारांनी नोटाचा वापर करून मतदान ...

In Ballarpur taluka, 706 voters preferred the note | बल्लारपूर तालुक्यात ७०६ मतदारांची नोटाला पसंती

बल्लारपूर तालुक्यात ७०६ मतदारांची नोटाला पसंती

बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यातील १० ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना पसंती न देता ७०६ मतदारांनी नोटाचा वापर करून मतदान करण्याचा आपला हक्क बजावला.

या निवडणुकीत १० ग्रामपंचायतीचे कारभारी बनण्यासाठी २८१ उमेदवार उभे होते. यापैकी गिलबिलीचे तीन व हडस्तीचे सहा असे नऊ उमेदवारांची अविरोध निवड झाली तर ८३ उमेदवारांना मतदारांनी निवडून आणले. यामध्ये विसापूर, हडस्ती, आमडी, कळमना, पळसगाव, गिलबिली, मानोरा, किन्ही, नांदगाव पोडे व कोर्टीमक्ता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वच ठिकाणी मतदारांनी नोटाला पसंती दिली. तर मानोरा प्रभाग १ व २ च्या उमेदवारांना नोटाची मते मिळाली असती तर ते विजयी झाले असते. त्याच प्रमाणे गिलबिलीचा एक, नांदगाव पोडेचा एक, पळसगावचे दोन, विसापूर प्रभाग पाच व सहाचे दोन उमेदवारांना पाडण्याचे काम नोटाने केले. विसापूरातील २०८ मतदारांनी नोटांचा वापर केला तर नांदगाव पोडेच्या १४९ व कळमनाच्या १०० मतदारांनी नोटांचा वापर केला.

Web Title: In Ballarpur taluka, 706 voters preferred the note

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.