बल्लारपूर पोलिसांच्या मोहल्ला समितीच्या सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:30 IST2021-03-23T04:30:21+5:302021-03-23T04:30:21+5:30
शहर व ग्रामीण नागरिकांना मार्गदर्शक सूचना बल्लारपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू होत असून, नागरिक बेफिकीर होऊन घराबाहेर झोपतात. ...

बल्लारपूर पोलिसांच्या मोहल्ला समितीच्या सभा
शहर व ग्रामीण नागरिकांना मार्गदर्शक सूचना
बल्लारपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू होत असून, नागरिक बेफिकीर होऊन घराबाहेर झोपतात. या संधीचा फायदा चोर घेत असतात. यासाठी नागरिकांनी जागरूक होण्याची गरज असून, बल्लारशाह पोलीस ठाण्यातर्फे शहर व ग्रामीण गावात जाऊन मोहल्ला समितीच्या बैठकीद्वारे ठाणेदार उमेश पाटील यांनी मार्गदर्शक सूचना देण्याची मोहीम सुरू केली आहे.
या संदर्भात बामणी येथील टीचर वसाहतीत आयोजित बैठकीत बामणीचे सरपंच सुभाष ताजने, जिल्हा परिषदेचे सदस्य ॲड. हरीश गेडाम, उप मुख्याधिकारी जयवंत काटकर यांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, चोऱ्यांचे प्रमाण उन्हाळ्याच्या दिवसांत जास्त वाढते. यासाठी लोकांनी घरासमोरील लाईट रात्रीच्या वेळेस सुरू ठेवावे, पोलीस ठाणे, अग्निशमन दल, रुग्णवाहिका फोन नंबर लिहून ठेवावा, शेजारील व्यक्तीचे मोबाईल नंबर ठेवावे, मुख्य दरवाजाला ग्रील लावून ठेवावी, दरवाजाचा पडदा नेहमी बाहेरून लावून ठेवावा व इतर मार्गदर्शक तत्त्वे सांगितली. यासाठी नागरिकांचे सहकार्य महत्त्वाचे असून, काही अडचण आल्यास पोलीस ठाण्याला १०० नंबरवर फोन करून कळवावे, अशी माहिती दिली. सभेत वॉर्डातील लोकांची उपस्थिती होती.