चिमूरकरांच्या मागण्या बालाजी महाराज पूर्ण करणार
By Admin | Updated: August 17, 2016 00:35 IST2016-08-17T00:35:48+5:302016-08-17T00:35:48+5:30
चिमूर ही क्रांतीभूमी आहे. चिमूरचा क्रांतीचा इतिहास जगभर प्रसिद्ध आहे.

चिमूरकरांच्या मागण्या बालाजी महाराज पूर्ण करणार
सुधीर मुनगंटीवार : चिमुरात शहीद स्मृती दिन सोहळा
चिमूर : चिमूर ही क्रांतीभूमी आहे. चिमूरचा क्रांतीचा इतिहास जगभर प्रसिद्ध आहे. तुकडोजी महाराजांच्या प्रेरणेने येथील युवकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात हिरहिरीने सहभाग घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या आशिर्वादाने व चिमूरचे कुलदैवत बालाजी महाराजांच्या कृपेने चिमूरकरांच्या सर्व मागण्या पूर्ण होणार असल्याचे राज्याचे अर्थ व नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चिमूर जिल्ह्याच्या प्रश्नावर थेट न बोलताही तसे सुतोवाच केले.
ते अभ्यंकर मैदान येथे शहीद स्मृती दिन सोहळा २०१६ या कार्यक्रमात शहिदांना विनम्र श्रद्धाजंली वाहण्यासाठी चिमूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते, प्रमुख पाहुणे म्हणून स्वातंत्र्य संग्राम सैनिक दामोधर काळे, आ. गिरीश व्यास, आ. अनिल सोले, आ. मितेश भांगडिया, आ. किर्तीकुमार भांगडिया, गवते महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, वसंत वारजूकर, नगराध्यक्ष शिल्पा राचलवार, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती देवराव भोंगळे, आरोग्य सभापती ईश्वर मेश्राम, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बकाराम मालोदे, जि.प. उपाध्यक्ष कल्पना बोरकर, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रमोद बारापात्रे, तालुका भाजपा अध्यक्ष डॉ. अनिल शिवरकर, जि.प. सदस्य गिता लिंंगायत, पं.स. सभापती वैशाली येसांबरे, भाजपा महामंत्री संजय गजपुरे, ज्ञानेश्वर शिरभैय्ये, श्याम हटवादे आदी उपस्थित होते.
मुनगंटीवार पुढे म्हणाले, चिमूर विधानसभेच्या विकासासाठी कटिबद्ध असून क्रीडा संकुलासाठी वेकोलिमार्फत पाच कोटी, नगर परिषद इमारतीसाठी सात कोटी रुपयाची तरतूद केली जाईल. (प्रतिनिधी)