घोडा रथयात्रेच्या मिरवणुकीने भारावले बालाजीभक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 05:01 IST2020-02-10T05:00:00+5:302020-02-10T05:01:11+5:30

पेशवाईच्या काळात जीर्णोध्दार झालेल्या या बालाजी मंदिराला ३९३ वर्षांचा इतिहास आहे. मंदिराची वास्तू भोसले कालीन आहे. चिमूर येथील घोडा रथ यात्रेला २४८ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. आजही तेवढयाच उत्साहात यात्रेत गावा-गावातील बालाजी भक्त दर्शन घेण्यास मोठया संख्येने गर्दी करतात.

Balaji devotees loaded with horse chariot pilgrimage | घोडा रथयात्रेच्या मिरवणुकीने भारावले बालाजीभक्त

घोडा रथयात्रेच्या मिरवणुकीने भारावले बालाजीभक्त

ठळक मुद्देहजारो भाविकांची उपस्थिती : गोविंदाच्या गजराने दुमदुमली नगरी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : ३९३ वर्षांची परंपरा असलेल्या क्रांती नगरीतील घोडा रथयात्रेला ३० जानेवारीपासून सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात शुक्रवारी रातघोडयापासून घोडा रथ यात्रेला प्रारंभ झाला. रात घोडयाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी चिमूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या बालाजी महाराजाचे दर्शन घेत या रात घोडयाच्या मिरवणुकीने पंचक्रोशीतील बालाजी भक्त भाराऊन गेले.
पेशवाईच्या काळात जीर्णोध्दार झालेल्या या बालाजी मंदिराला ३९३ वर्षांचा इतिहास आहे. मंदिराची वास्तू भोसले कालीन आहे. चिमूर येथील घोडा रथ यात्रेला २४८ वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. आजही तेवढयाच उत्साहात यात्रेत गावा-गावातील बालाजी भक्त दर्शन घेण्यास मोठया संख्येने गर्दी करतात.
शुक्रवारी रात घोडयाच्या मिरवणुकीत माजी आमदार मितेश भांगडिया, आमदार कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिया, वसंत वारजूकर, उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, ठाणेदार स्वप्नील धुळे, बालाजी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष मंगेश भलमे, डॉ. दीपक यावले, निलम राचलवार, सुरेश डाहुले, चंद्रकांत भोपे उपस्थित होते.
मिरवणुकीअगोदर विधिवत पूजा करून मिरवणुकीला रात्री १२ वाजतानंतर भक्तीमय वातावरणात मोठया ढोलताश्याच्या गजरात फटाक्याच्या आतिषबाजीने सुरूवात करण्यात आली. रात घोडयाची मिरवणूक बालाजी मंदिर, ते नेहरू चौक, अंहिसा चौक, बाजार ओळ, शिवाजी चौक, शहीद बालाजी रायपूरकर चौक अशी फिरत सकाळी ५.३० वाजता बालाजी मंदिरात विराजमान झाली.
या मिरवणुकीमध्ये महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड येथील हजारो बालाजी भक्त मोठया उसाहात सहभागी झाले होते. भक्ती-संगिताच्या तालावर व आतिषबाजीने बालाजी भक्ताचे डोळ्याचे पारणे फिटले तर गोविंदा - गोविदाच्या गजराने चिमूर क्रांती नगरी दुमदुमून गेली होती. या यात्रेमुळे चिमुरात भक्तीचे वातावरण आहे.

महाशिवरात्रीपर्यंत चालणार यात्रा
महाशिवरात्रीपर्यंत चालणाऱ्या घोडा रथ यात्रेमध्ये यावर्षीचे विशेष आकर्षण बालाजी मंदिराच्या आवारातील अयोध्या येथील प्रसिद्ध श्री राम मंदिराची प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती बालाजी भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. यात्रेदरम्यान चिमूर नगरीत मनोरजंनाच्या साधनासह, मौत का कुआ, आकाश पाळणे, असे अनेक प्रकारच्या दुकानासह मिनी सर्कस यात्रेकरूंचे लक्ष वेधत आहे.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
स्थानिक नगर परिषद प्रशासन व श्रीहरी बालाजी देवस्थान कमिटी यांनी भक्तासाठी विविध सोई पुरवल्या आहेत. तर यात्रेदरम्यान शांतता सुव्यवस्था ठेवण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार स्वप्निल धुळे यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.

Web Title: Balaji devotees loaded with horse chariot pilgrimage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.