‘व्हॅलेन्टाईन डे’ च्या विरोधासाठी बजरंग दलाची रॅली

By Admin | Updated: February 15, 2016 01:03 IST2016-02-15T01:03:39+5:302016-02-15T01:03:39+5:30

पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग असलेल्या ‘व्हॅलेन्टाईन डे’ ला विरोध करण्यासाठी रविवारी बजरंग दलाच्यावतीने चंद्रपुरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

Bajrang Dal rally against 'Valentine's Day' | ‘व्हॅलेन्टाईन डे’ च्या विरोधासाठी बजरंग दलाची रॅली

‘व्हॅलेन्टाईन डे’ च्या विरोधासाठी बजरंग दलाची रॅली

चंद्रपूर : पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग असलेल्या ‘व्हॅलेन्टाईन डे’ ला विरोध करण्यासाठी रविवारी बजरंग दलाच्यावतीने चंद्रपुरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. तरुणाईने व्याभिचारापासून दूर राहण्याचे आवाहन या रॅलीद्वारे करण्यात आले.
स्थानिक समाधी वॉर्डातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयापासून निघालेली ही रॅली जोडदेऊळ चौक, मिलन चौक, गांधी चौक, जटपुरा या मार्गाने फिरून कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौकात पोहचली. तेथे रॅलीचे विसर्जन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड.हरिष मंचलवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘व्हॅलेन्टाईन डे’ चा निषेध करून ‘जय श्री राम’, ‘भारत माता की जय’, ‘भारतीय संस्कृतीचा विजय असो’ अशा घोषणा देण्यात आल्या. आमचा विरोध प्रेमाला नसून प्रेमाच्या नावाखाली चालणाऱ्या व्याभिचारी कृत्याला असल्याचे यावेळी बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. ही रॅली विहिंपेचे मंत्री अ‍ॅड.हरिष मंचलवार, जिल्हा संयोजक अंकुश चौधरी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. रॅलीमध्ये बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक कमलेश मडावी, सागर कालिया, प्रसाद शेटे, शहर संयोजक अंकुश दारव्हेकर, नगर सहसंयोजक विठ्ठल निखारे, सुहास मोहुर्ले, संपर्क प्रमुख निलेश शर्मा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Bajrang Dal rally against 'Valentine's Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.